ETV Bharat / state

पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे

author img

By

Published : Sep 29, 2019, 3:11 PM IST

पंतप्रधान म्हणतात, 'भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध अजिबात उपयोगाचा नाही'., असे वादग्रस्त विधान करत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

संभाजी भिडे

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली येथील दुर्गा दौडी नंतर केलेल्या आपल्या भाषणात वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्र संघटनेत केलेल्या भाषणातील एका मुद्द्यावर आपली नापसंती व्यक्त करताना भिडे यांनी, 'जगाला बुद्ध दिला पण तो उपयोगाचा नाही', असे म्हटले आहे. सांगलीत रविवारपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौड शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले 'भारताने जगाला बुद्ध दिला पण बुद्ध उपयोगाचा नाही', पंतप्रधान चुकीचं बोलले

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केलेल्या वक्तव्यावर टीका केला आहे. मात्र टिका करत असताना त्यांनी स्वतः एक वादग्रस्त विधान केले आहे.

हेही वाचा... भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी

काय म्हणाले संभाजी भिडे ?

भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, बुद्ध दिला खरा पण बुद्ध उपयोगाचा नाही, अजिबात नाही., असे भिडे यावेळी म्हणाले आहेत. तसेच मोदी हे चुकीचे बोलले असेही मत त्यांनी व्यक्त केले.

जगाला बु्द्धाची नाही तर संभाजी महाराज यांची गरज आहे.

बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला., तर नीती, धर्म यांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी दिलीय यामुळे संपुर्ण विश्वाच्या कल्याणाची जबाबदारी असणाऱ्या भारताला आता त्यांच्या विचारांची गरज आहे., आणि नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य महाराष्ट्र बदलू शकतो., असेही भिडे यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा... खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला

काय म्हटले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत आमसभेच्या भाषणात बोलताना पाकिस्तानला टोला लगावला होता. यावेळी त्यांनी, भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, असे म्हटले होते.

सांगलीत आज पासून नवरात्र निमित्ताने दुर्गामाता दौडीची सुरुवात झाली. शिवप्रतिष्ठाच्या वतीने दरवर्षी या दौडीचे आयोजन करण्यात येते. भल्या पहाटे निघणाऱ्या या दौडीत हजारो धारकरी सहभागी होतात. रविवारी संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीती या दौडीचा प्रारंभ झाला.

Intro:File name - mh_sng_01_bhide_guruji_on_modi_vis_01_7203751 - mh_sng_01_bhide_guruji_on_modi_byt_03_7203751


स्लग - पंतप्रधान हे चुकिचे बोलले, बुद्ध नव्हे छत्रपतींचे विचार गरजेचे - सभाजी भिडे गुरुजी...

अँकर - भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आक्षेप घेत, बुद्ध उपयोगाचा नाही,मोदी चुकीचे बोलले असं मत व्यक्त करत,पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.सांगलीत आज पासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौड शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.Body:आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत केलेल्या वक्तव्यावरून मोदी यांच्यावर टीका केला आहे.हस्टन येथे बोलताना नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले,असे मत व्यक्त केले होते. मात्र मोदींच्या या वक्तव्यावर संभाजी भिडे गुरुजी यांनी आक्षेप नोंदवला आहे.
मोदी चुकीचे बोलले,अस स्पष्ट करत बुद्ध काही उपयोगाचे नाही.असे वादग्रस्त वक्तव्य करत मोदींच्यावर टीका केली आहे.तसेच नीती,धर्म छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी दिले.आणि मोदींचे हे वक्तव्य महाराष्ट्र बदलू शकतो. असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
सांगलीत आज पासून नवरात्र निमित्ताने दुर्गामाता दौडीची सुरुवात झाली. शिवप्रतिष्ठाच्या वतीने दरवर्षी य दौडीचे आयोजन करण्यात येते,भल्या पहाटे निघणाऱ्या या दौडीत हजारो धारकरी सहभागी होतात, संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीती या दौडीचा प्रारंभ झाला.

बाईट :- संभाजी भिडे ,गुरुजी,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.