ETV Bharat / state

महापूर ओसरल्यानंतर सांगलीवर आता कचऱ्याचे संकट; कचराकोंडी हटवण्यासाठी संतप्त पूरग्रस्तांचा रास्ता रोको

author img

By

Published : Aug 15, 2019, 5:20 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:36 PM IST

कृष्णा नदीला आलेला महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त आता आपआपल्या घरी परतत आहेत. घराची सफाई करत असताना घरातील भिजलेले टाकाऊ साहित्य आणि कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. मात्र, हा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी नांद्रे-सांगली मार्गावर  रास्ता रोको आंदोलन केले.

पाण्याचा महापूर ओसरल्यानंतर सांगलीवर आता कचऱ्याच्या महापुराचे संकट

सांगली - कृष्णा नदीला आलेला महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त आता आपआपल्या घरी परतत आहेत. घराची सफाई करत असताना घरातील भिजलेले टाकाऊ साहित्य आणि कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. मात्र, हा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी नांद्रे-सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पूरग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.

महापूर ओसरल्यानंतर सांगलीवर आता कचऱ्याचे संकट

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्नाळ रोडवरील साईनाथ नगरमध्ये शेकडो पूरग्रस्त आपल्या घराची सफाई करत आहेत. या ठिकाणी अद्याप कोणताही अधिकारी किंवा नगरसेवक किंवा फिरकले नाही. त्यामुळे, या भागातील पूरग्रस्तांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. आज नागरिकांनी तब्बल एक तास नांद्रे-सांगली मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

कचरा उठाव होत नसल्याने, या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच शासनाची मदतही अद्याप पोहोचली नसल्याचा आरोप पूरग्रस्तांना यावेळी केला आहे.

Intro:Exclusive

Feed send FTP

File name ;- mh_sng_04_purgrast_andolan_vis_7203751 - to -mh_sng_04_purgrast_andolan_byt_7203751


स्लग - मदत आणि कचरा उठाव होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांना केला रस्ता रोको...

अँकर - मदत आणि कचरा उठाव होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांना रास्ता रोको आंदोलन केला आहे शहरातल्या करणार रोडवर त्यांनी रस्त्यावर उतरत वाहतूक रोखून धरली होती त्यानंतर पोलिस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन नागरिकांना मदत देण्याचे आश्वासन केल्यानंतर पूरग्रस्तांना रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं.Body:कृष्णानदीच्या महापुरामुळे शहर बुडाल होते.आता हा पूर ओसरला आणि पूरग्रस्त आपल्या घरी परतत आहेत. आणि या घरातून आता मोठ्या प्रमाणात भिजलेल्या सर्व साहित्य बाहेर काढत आहेत. गेल्या तीन दोन-तीन दिवसांपासून सांगली शहराचा उपनगर असणाऱ्या कर्नाळ रोडवरील साईनाथ नगर याठिकाणी शेकडो पूरग्रस्त आपल्या घराची सफाई करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरातला भिजलेला कचरा साहित्य रस्त्यावर त्यांना टाकण्याशिवाय पर्याय नाही मात्र याठिकाणी तीन दिवसांपासून अद्यापही कोणताही पदाधिकारी, नगरसेवक असेल किंवा प्रशासन फिरकले नाही.त्यामुळे या भागातल्या पूरग्रस्तांच्या मध्ये प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.आणि आज संतप्त पूरग्रस्तांना नांद्रे-सांगली मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आहे.यावेळी संतप्त पूरग्रस्तांना तब्बल एक तास या मार्गावरील वाहतूक रोखून धरली होता,या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.तर या भागात कचरा उठाव होत नसल्याने, या ठिकाणी आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे ,तसेच शासनाच्या मदतही अद्याप या ठिकाणी पोहचत नसल्याचा आरोप पूरग्रस्तांना केला आहे.तर तरी आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाने या ठिकाणी काही वेळातच धाव घेतले आणि संतप्त पूरग्रस्तांना शांततेचे आवाहन करत प्रशासनाकडून मदत नक्की मिळेल असा आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन मागे घेतला.
Conclusion:
Last Updated : Aug 15, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.