ETV Bharat / state

Krishna River Pollution कृष्णा नदीत मिसळते शहरातील सांडपाणी, प्रदूषण महामंडळाने बजावली महापालिकेला नोटीस

author img

By

Published : Jan 5, 2023, 4:02 PM IST

कृष्णा नदीच्या पात्रात ( Krishna River Pollution ) राजरोसपणे शहरातील सांडपाणी मिसळले जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण ( Pollution Control Board Sends Notice To Sangli Corporation )होत आहे. याविरोधात दत्ता पाटील यांनी शोले स्टाईल आंदोलन केले होते. त्यानंतर प्रदूषण मंडळाने कृष्णा नदीची ( Pollution Control Board Sends Notice ) पाहणी केली. यावेळी शहरातील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रदूषण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

Krishna River Pollution Sangli
कृष्णा नदीत मिसळणारे शहरातील सांडपाणी

कृष्णा नदीत मिसळणारे शहरातील सांडपाणी

सांगली - कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी ( Krishna River Pollution ) प्रदूषण महामंडळाने सांगली महापालिकेला नोटीस ( Pollution Control Board Sends Notice To Sangli Corporation ) बजावली आहे. कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत योग्य ते नियोजन करावे आणि कृष्ण नदी पात्रामध्ये मिसळण्यात येणारे सांडपाणी रोखावे, अन्यथा महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे महापालिकेला ( Pollution Control Board Sends Notice ) देण्यात आला आहे.

लाखो लिटर सांडपाणी दररोज थेट कृष्णा नदी पात्रात सांगली शहरातील लाखो लिटर सांडपाणी दररोज थेट कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण वाढत आहे. यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रदूषण महामंडळाच्या आणि महापालिका ( Sangli Corporation ) प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर असणाऱ्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रदूषण थांबवण्याबाबत मागणी केली होती.

प्रदूषण महामंडळाकडून कृष्णा नदीची पाहणी या पार्श्वभूमीवर प्रदूषण महामंडळाकडून कृष्णा नदीची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तीन ठिकाणाहून दूषित आणि सांडपाणी हे थेट कृष्णा नदी पात्रामध्ये मिसळत असल्याचे समोर आले आहे. शेरीनाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारे सांडपाणी हे कृष्णा नदीपात्रामध्ये मिसळत असल्याचे देखील अधिकाऱ्यांना पाहायला मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क देखील केला. मात्र त्यांना उचित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे प्रदूषण महामंडळाच्या उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांनी सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये महापालिकेने तातडीने कृष्णा नदीपात्रामध्ये मिसळणाऱ्या पाणी थांबवण्याबाबतचे नियोजन करावे. जर प्रदूषण थांबले गेले नाही, तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, असा इशारा प्रदूषण महामंडळाकडून नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

हरित लवादाने महापालिकेला ठोठावला दंड मात्र गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदी पात्रामध्ये रोजरासपणे सांडपाणी मिसळत आहे. इतकेच नव्हे तर कृष्णाकाठी असणाऱ्या अनेक गावांचे आणि साखर कारखान्यांचे दूषित पाणी देखील कृष्णा नदी पात्रामध्ये खुलेआमपणे सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदी पात्रातील लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनाही गेल्या वर्षात अनेक वेळा घडल्या आहेत. आता महापालिका क्षेत्रातील सांडपाणी मिसळल्याच्या मुद्दा पुन्हा पुढे आल्याने, या पार्श्वभूमीवर प्रदूषण महामंडळाकडून पालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीही प्रदूषण महामंडळाकडून वारंवार महापालिका प्रशासनाला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हरित न्यायालयाने देखील महापालिकेला नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत दंड देखील ठोठावला आहे. तो दंड महापालिका आपल्या स्वतंत्र्य खात्यावर रोजरासपणे भरत देखील आहे. त्यामुळे आता प्रदूषण महामंडळाच्या नव्याने पाठवण्यात आलेल्या नोटीसनंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार की, ढिम्म प्रशासन प्रदूषण महामंडळाच्या नोटीसला केराची टोपली दाखवणार ? हे पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.