ETV Bharat / state

आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री

author img

By

Published : Apr 21, 2021, 7:49 PM IST

Updated : Apr 23, 2021, 1:35 PM IST

राज्यातील ५० वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना आता केवळ कार्यालयीन कामकाज करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच रेमडेसीवीरचा साठा करू देणार नाही, असेही ते म्हणाले.

On-field inspection of curfew ...
संचारबंदीचा ऑन फील्ड पाहणी...

सांगली - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५० वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना आता केवळ कार्यालयीन कामकाज करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच रेमडेसीवीरचा साठा करू देणार नाही, त्याचबरोबर पोलिसांवर दबाव टाकल्याबदल गृहमंत्री कारवाईचा निर्णय घेतील,असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

५० वर्षावरील पोलिसांना दिलासा..
संचारबंदीचा ऑन फील्ड पाहणी...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगली जिल्ह्यातील संचारबंदीचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पोलिसांची नाकाबंदीची पाहणी करत जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त बाबत बैठक घेऊन आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत,कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बध लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सक्षम आहेत.
योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत,असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

५० वर्षावरील पोलिसांना दिलासा..

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे आणि रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस कर्मचारी अधिकारी यांना ही करण्याची लागण होत असल्याची बाब समोर येत आहे, विशेषता ज्या पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांचे वय अधिक आहे त्यांना याबाबत अधिक धोका आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ज्या पोलिस कर्मचारी अधिकारी यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, अशा पोलिसांना फील्ड वर्क न देता केवळ कार्यालयीन कामकाज देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत,अशी माहिती गृहराज्यमंत्री देसाई यांनी यावेळी दिली.

दबाव आणल्यास करवाई होणार..

रेमडेसीवीर बाबतीत देसाई म्हणाले,राज्यात कुठे ही रेमडेसीवीरचा साठा करू देणार नाही. जर साठा आढळल्यास तो जप्त केला जाईल आणि जप्त साठा राज्यसरकार आपल्या ताब्यात घेणार.,
असे स्पष्ट करत ब्रूक कंपनीच्या रेमडेसीवीरचा साठया प्रकरणी बोलताना त्याठिकाणी रेमडेसीवीर साठा असल्याचे कळले होते आणि चौकशी साठी पोलीस गेले होते. त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि दरेकर गेले.जर जाणीवपूर्वक दोन्ही नेते पोलिसांवर दबाव आणत असतील तर गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील हे योग्य ती कारवाईचा निर्णय घेतील,असं यावेळी मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

कोरोना बाबत राजकारण नाही...

तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरवर कसले ही राजकारण राज्य सरकारला करायचे नाही. मात्र केंद्र सरकार अधिका-अधिक ऑक्सिजन आणि रेमडीसिव्हर राज्य सरकारला उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे,असा विश्वास यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या

निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली

गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली

आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री

कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार

हेही वाचा - नाशिक येथील दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Last Updated : Apr 23, 2021, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.