ETV Bharat / state

जतमध्ये राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; आरोपींनी पकडण्यात नगरसेवकाची मोलाची भूमिका

author img

By

Published : Jun 11, 2020, 10:39 PM IST

Updated : Jun 11, 2020, 10:51 PM IST

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जत-सांगली रस्त्यावरील खलाटी येथील आडव्या डोंगराच्या बाजूला दोन मोटर सायकली बाजूला थांबवून चार संशयित लोक डोंगराच्या दिशेने काहीतरी पाहत होते. याच वेळी जत पालिकेचे नगरसेवक उमेश सावंत, संतोष मोटे आणि विजय सावंत हे तिघे जण सांगलीकडे निघाले होते. यावेळी या तिघांकडे गाडीतील संतोष मोटे यांची नजर गेली.

National bird peacock hunting in Jat sangli, accused arrested
जतमध्ये राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; आरोपींनी पकडण्यात नगरसेवकाची मोलाची भूमिका

जत (सांगली) - राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराची तालुक्यात शिकार करून पळून जाणाऱ्या तिघा आरोपींना पकडण्यात आले आहे. नगरसेवक उमेश सावंत यांना संशय आल्याने सांगलीकडे जाणाऱ्या या तिघांचा पाठलाग करून त्यांनी आरोपींनी ताब्यात पकडले. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. शशिकांत प्रभू पवार (वय - 28 रा. हळ्ळी ता. जत), लक्ष्मण पारख्या पवार (वय - 80, रा. आरग), जयवंत दिलीप काळे (वय - 30, रा.सोनी ता.मिरज) अशी आरोपींची नावे आहेत.

जतमध्ये राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; आरोपींनी पकडण्यात नगरसेवकाची मोलाची भूमिका

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जत-सांगली रस्त्यावरील खलाटी येथील आडव्या डोंगराच्या बाजूला दोन मोटर सायकली बाजूला थांबवून चार संशयित लोक डोंगराच्या दिशेने काहीतरी पाहत होते. याच वेळी जत पालिकेचे नगरसेवक उमेश सावंत, संतोष मोटे आणि विजय सावंत हे तिघे जण सांगलीकडे निघाले होते. यावेळी या तिघांकडे गाडीतील संतोष मोटे यांची नजर गेली. गाडीतील तिघांना हे लोक काहीतरी शिकार करत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर त्यांनी पुढे गेलेली गाडी मागे वळवून या तिघांच्या जवळ जाऊन चौकशी केली.

कसून चौकशी करताना या तिघांना तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरसेवक सावंत व संतोष मोटे यांनी पाठलाग करून तिघांना पकडले. त्यांच्या हातातील पिशवी ताब्यात घेतल्यानंतर त्या चक्क राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराची त्यांनी शिकार केल्याचे लक्षात आले. मोराला मारल्याचे पाहता नगरसेवक उमेश सावंत आणि संतोष मोठे यांनी त्यांना बेदम चोप देत अडवून ठेवले.

घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर या आरोपींना पोलीस आणि वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वन खात्याने आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वन विभाग आणि पोलीस करत आहेत. तर सावंत,मोटे यांच्या कामाचे सर्वत्र मोठे यांच्या कामाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वनविभाग झोपले आहे का?

जत तालुक्यात वनक्षेत्र मोठे आहे. मोरांसह विविध पक्षी, प्राणी यांची संख्या येथे आहे. असे असताना दिवसाढवळ्या मोरांसह विविध प्राणी पक्षाची शिकार केली जाते. गुरुवारचा प्रकार उघडकीस आल्याने वनविभागाचा गांधारी कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिवाय या प्रकारामुळे नागरिक व पशुप्रेमीतून तीव्र सतांपही व्यक्त केला जात आहे.

Last Updated : Jun 11, 2020, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.