ETV Bharat / state

Marataha Reservation : नसेल तर, मराठा समाजाला जात बदलण्याची परवानगी द्या - मराठा क्रांती मोर्चाची मागणी

author img

By

Published : Dec 11, 2021, 4:07 PM IST

महाविकासआघाडी सरकारमधल्या मराठा समाजातल्या (Marataha Reservation) नेत्यांच्या धोरणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मराठा समाजातल्या मंत्र्यांनी एक तर त्यांची जात बदलावी. असे न केल्यास मोठे आंदोलन करण्याची मागणीही मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) दिली आहे.

Marataha Reservation
Marataha Reservation

सांगली - मराठा आरक्षण (Marataha Reservation) व इतर मुद्द्यांवरून मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा नेत्यांना जात बदलण्याचे आवाहन केले आहे , नसेल तर मराठा समाजाला जात बदलण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.तसेच येत्या आठ दिवसात मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका सरकारकडून न घेतल्यास सांगलीतून एक मोठे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची मागणी
आरक्षण प्रश्न मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा मैदानात उतरण्याची भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजाला अद्यापि आरक्षण मिळालेलं नाही. तसेच राज्य सरकारकडून ज्या काही मराठा समाजाला सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ मिळालेला नाही. ज्या संस्था सुरू करण्यात आलेल्या त्याच्या माध्यमातून ही मराठा समाजातल्या तरुणांना फायदा झालेला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत व इतर मुद्द्यांवर गठीत करण्यात आलेल्या समितीने साधी बैठक देखील घेतली नाही.
तुम्ही तर बदला ,नसेल तर आम्हाला परवानगी द्या
महाविकासआघाडी सरकारमधल्या मराठा समाजातल्या नेत्यांच्या धोरणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मराठा समाजातल्या मंत्र्यांनी एक तर त्यांची जात बदलावी. नसेल तर मराठा समाजाला जात बदलण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगलीमध्ये पत्रकार परिषदेतून करण्यात आली. तसेच येत्या आठ दिवसात मराठा आरक्षण व सवलतीबाबत आघाडी सरकारने सकारात्मक पाऊले न उचलल्यास सांगलीतून मराठा समाजाचे तीव्र आंदोलन सुरु करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.