ETV Bharat / state

निवडणुकीमुळे कोरोना वाढतो हे स्पष्ट, राज्यात निवडणुका घेऊ नका - राजू शेट्टी

author img

By

Published : May 11, 2021, 4:43 PM IST

निवडणुकीमुळे कोरोना वाढत आहे, हे स्पष्ट असून आता राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

election rise corona Raju Shetty reaction
निवडणूक कोरोना वाढ राजू शेट्टी प्रतिक्रिया

सांगली - निवडणुकीमुळे कोरोना वाढत आहे, हे स्पष्ट असून आता राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच, कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत प्रशासन सुस्त असून रुग्णांवर उपचार व बरे करण्याचे सोडून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली, ते सांगलीमध्ये बोलत होते.

बोलताना माजी खासदार राजू शेट्टी

हेही वाचा - क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर पोलिसांकडून कारवाई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही प्रशासन सुस्त

कोरोनाच्या परिस्थितीवरून राजू शेट्टी यांनी केंद्राने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे, सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे किंवा त्यांना बरे करणे यापेक्षा राज्य सरकार केंद्रावर तर केंद्र सरकार राज्य सरकारवर आरोप करत आहे. आज राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, त्यामुळे काळाबाजार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला लसीसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे. तर, गत वर्षेच्या लाटेपेक्षा दुसरा लाटेत प्रशासन अधिक सुस्त झाले आहे, असा आरोप करत आज सामाजिक संस्था कोविड सेंटर उभरण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र आरोग्य विभाग काही करत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

आता या पुढे निवडणूक घेऊ नये

पंढरपूर - मंगळवेढा पोट निवडणुकीवरून बोलताना शेट्टी म्हणाले, निवडणुकीत यश अपयश चालत राहते, पण या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. एकूणच ज्या ज्या ठिकाणी निवडणूक झालेल्या आहेत, त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचे समोर आलेले आहे. मग कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळची निवडणूक असू दे, किंवा पंढरपूरच्या पोटनिवडणुका असो. निवडणूक आली की गर्दी आणि संसर्ग, त्यामुळे राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या निवडणुका कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्या शिवाय घेऊ नये, अशी मागणी शेट्टी यांनी केला.

हेही वाचा - जतमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.