ETV Bharat / state

वाढत्या रुग्ण संख्येमुळे गृह अलगिकरण रद्द, रुग्णांसाठी उभारली नवी समस्या

author img

By

Published : May 27, 2021, 10:33 PM IST

सांगली जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने पॉझिटिव्हिटि दर वाढले आहे. यामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. म्हणून सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना आता गृह अलगिकरणात राहता येणार नाही.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली - जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थिती गंभीर आहे. अशात रोज हजाराच्या पार जाणारी संख्येमुळे आजही रुग्णांना ऑक्सिजनच्या बेडपासून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होण्यामध्ये कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तर जिल्ह्याचा वाढलेल्या पॉझिटिव्हिटी दरामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. यामुळे गृहअलगीकरण रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोना रुग्णांना अलगीकरणासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत. त्या होताना दिसत नसल्याने कोरोनाग्रस्तांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

सर्व पातळ्यांवर प्रशासनाकडून नियोजन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगली जिल्हाही अडकलेला आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. आजही कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि रुग्णवाहिका, यासारख्या गोष्टींसाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्यात सध्या मिरजेचे शासकीय कोरोना रुग्णालयाबरोबर इतर शासकीय व खासगी 80 हुन अधिक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सुमारे 4 हजारहून अधिक ऑक्सिजन बेड, 1 हजारच्या आसपास आयसीयू बेड आहेत. या शिवाय सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात सुमारे 50 हून अधिक कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये आहे. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन अगदी सुरळीतपणे मिळत आहेत. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची सध्याची स्थिती

मागील तीन दिवसात 3 हजार 784 इतक्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. गेल्या 3 दिवसात 4 हजार 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 3 तीन दिवसात 94 जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात निर्बंध लागू होण्यापूर्वी 4 मे रोजी अखेर दीड हजार इतकी रुग्णसंख्या होती. तर दोन दिवसांनी ती 2 हजारांच्या पार गेली आणि निर्बंधानंतर त्यामध्ये कमी जास्त प्रमाणा असून निर्बंधामुळे वाढती रुग्ण संख्या स्थिर आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या 12 हजार 876 इतकी आहे.

सांगली जिल्ह्याची लोक संख्याही जवळपास 30 लाखांच्या सुमारास आहे.

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर हा 22 टक्के आहे.

आतापर्यंत 6 लाख 74 हजार 761 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

पॉझिटिव्हिटी दर वाढल्याने जिल्हा रेड झोन

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 22 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने सांगली जिल्हा रेड झोनमध्ये जाहीर केला आहे. अशा या परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून गृह अलगीकरणसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाला आता घरामध्ये अलगीकरण होता येणार नाही, या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये जावे लागणार आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून मात्र तशी सेंटर उभारण्याच्या दृष्टीने किंवा वाढवण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळत नाही.

हेही वाचा - आर्थिक संकटात 'नमराह कोविड हॉस्पिटल' गरिबांसाठी बनलंय संजीवनी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.