ETV Bharat / state

चांदोली धरणावर अतिवृष्टी, सकाळपासून विसर्ग सुरू

author img

By

Published : Aug 17, 2020, 5:16 PM IST

heavy rains in chandoli dam area in sangl
heavy rains in chandoli dam area in sangl

रविवारी 14395 क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीत सोडण्यात आला होता. तो विसर्ग वाढऊन आज सकाळी आठ वाजता 14 हजार 486 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू केले असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे वारणा पाटबंधारे शाखा अधिकारी टी. एम. धामणकर यांनी सांगितले.

सांगली - चांदोली धरणातून 14486 क्युसेक्स इतका विसर्ग आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आला असल्याची माहिती शाखा अधिकारी टी. एम. धामणकर यांनी दिली. धरणावर पावसाचा जोर वाढला असल्याने धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढवला जात आहे.

रविवारी 14395 क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीत सोडण्यात आला होता. तो विसर्ग वाढऊन आज सकाळी आठ वाजता 14 हजार 486 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू केले असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे वारणा पाटबंधारे शाखा अधिकारी टी. एम. धामणकर यांनी सांगितले आहे. तर शिराळा तालुक्याबरोबर वाळवा तालुक्यात ही पावसाचा जोर वाढला असून छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले असून कृष्णा व वारणा नद्या दुधडी भरून वाहत आहेत. तर चिकुर्डे येथील जुना पूल व ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी पूल सध्या पाण्याखाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.