ETV Bharat / state

Girlfriend Murder In Sangli : प्रेयसीने बर्थडे गिफ्ट म्हणून मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने काढला काटा

author img

By

Published : Jun 15, 2022, 5:17 PM IST

Updated : Jun 15, 2022, 5:30 PM IST

कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये 6 जून रोजी एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली होती. त्यानंतर कडेगाव पोलिसांनी गतीने तपास केला असता सदर महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर नदीच्या पात्रात फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हा खून त्या मुलीच्या प्रियकराने केल्याचे उघडकीस झाले आहे. ( Girlfriend Murder In Sangli )

Girlfriend Murder In Sangli
प्रेयसीने बर्थडे गिफ्ट म्हणून मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने काढला काटा

सांगली - वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून एक प्रेयसीने प्रियकराकडे सोन्याची अंगठी मागितली होती. त्यानंतर प्रियकराने थेट प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कडेगाव पोलिसांनी उघडकीस आणली ( Girlfriend Murder In Sangli ) आहे. या प्रकरणी विटा येथील प्रियकरास अटक करण्यात आली आहे.

वाढदिवसाच्या गिफ्टची मागणी - याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये 6 जून रोजी एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली होती. त्यानंतर कडेगाव पोलिसांनी गतीने तपास केला असता सदर महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर नदीच्या पात्रात फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अधिक तपास केला असता यामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. विटा या ठिकाणी असणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाकडे 32 वर्षीय प्रियसीने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी मागितली. त्यामुळे सराफा व्यावसायिक राहुल पवार (वय 31) याने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सराफा व्यवसायिकास अटक करण्यात आली आहे.

मृतदेह दिला नदीत फेकून - प्रेयसी ही विटा येथील एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती. एका हॉटेलमध्ये चपाती आणि भाकरी करण्याचे काम करत होती. या दरम्यान तिचे विट्यातील राहुल पवार युवकाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून त्यांचे अनैतिक संबंध देखील निर्माण झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुलची प्रियसी ही त्याच्या सोन्याच्या दुकानात गेली होती. व तिने राहुल याच्याकडे वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून एक ग्रॅम सोन्याची अंगठी देण्याची मागणी केली. अंगठी न दिल्यास त्यांच्या अनैतिक संबंधाच्या माहिती राहुलच्या कुटुंबियांना देण्याची धमकी दिली होती. यातून राहुल याने 5 जून रोजी प्रेयसीला आपल्या सोबत एका गाडीतून कडेगाव दिशेने नेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर येरळा नदीच्या पात्रामध्ये पुलावरून तिचा मृतदेह टाकला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार

हेही वाचा - Sangli Crime : गुंडेवाडीत प्रेम प्रकरणातून मित्राने केली मित्राची हत्या

हेही वाचा - मुंबईत 19 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 आरोपींना अटक

Last Updated : Jun 15, 2022, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.