ETV Bharat / state

बंदी असलेल्या चारचाकी गाड्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

author img

By

Published : Feb 24, 2021, 5:34 PM IST

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून भारत सरकारने मार्च 19 पासून विक्रीस बंद केलेल्या बीएस 4 इंजिन पद्धतीच्या चारचाकी गाड्या बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन रामगोंडावरू, अभय पवार, अनाम सिद्दीकी आणि अभिजित सावंत अशी 4 जणांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Gang selling four-wheelers arrested in sangli
Gang selling four-wheelers arrested in sangli

सांगली - भंगारातील गाड्यांची विक्री करणाऱ्या एका टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. 4 जणांना अटक करत त्यांच्याकडून 37 लाख 80 हजार किमतीच्या 9 चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सांगली

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून भारत सरकारने मार्च 19 पासून विक्रीस बंद केलेल्या बीएस 4 इंजिन पद्धतीच्या चारचाकी गाड्या बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन रामगोंडावरू, अभय पवार, अनाम सिद्दीकी आणि अभिजित सावंत अशी 4 जणांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुराच्या पाण्यात खराब झालेल्या गाड्या असल्याचा बहाणा

या चौघांच्याकडून पुराच्या पाण्यात खराब झालेल्या गाड्या आहेत, असे सांगत बीएस 4 इंजिनाच्या चारचाकी गाड्या विक्री करण्याचा उद्योग सुरू होता. याबाबत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली, यानंतर पथकाने मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ असणाऱ्या सचिन रामगोंडावर यांच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला, त्याठिकाणी काही बंदी घातलेल्या बीएस 4 इंजिनच्या चारचाकी गाड्या आढळून आल्या.

बोगस वाहन क्रमांक लावून कमी दरात या गाड्यांची टोळीकडून विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी सचिन रामगोंडावरसह त्याच्या इतर 3 साथीदार अशा चौघांना अटक करून त्यांच्याकडून 37 लाख 80 हजार किंमतीच्या 9 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.