ETV Bharat / state

Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

author img

By

Published : Jan 27, 2023, 7:18 PM IST

शालेय पोषण आहारातून सुमारे 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. शहरातल्या वानलेसवाडी हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. यानंतर विद्यार्थ्यांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

students poisoned by school nutrition
शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा

सांगली : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा समोर आले आहे.

सर्वांची प्रकृती स्थिर : मळमळ,उलट्या, जुलाब प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवले. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्य परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर, उत्तम असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अन्न, औषध अधिकारी सुकुमार चौगुले यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेत विद्यार्थ्यांची प्रकृतीची चौकशी केली.

पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास : यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. या बाबत शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, वानलेसवाडी हायस्कूल येथील शाळेमध्ये 300 विद्यार्थी आहेत. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार दिला जातो. मात्र, आज या ठिकाणी पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ,जुलाब,उलटी, डोके दुखणे, त्रास सुरु झाला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवरच्या डॉक्टरांकडे या मुलांना दाखवण्यात आले.

सर्वांची प्रकृती उत्तम : मात्र,डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या सूचना दिल्यानंतर 32 विद्यार्थ्यांना शिष्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांची सर्व तपासणी करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये सर्व मुले उत्तम असल्याचे डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आले आहे. काही मुलांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. मात्र, ज्या बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात आला आहे त्या पोषण आहारचे नमुने घेण्यात आले आहे.

किचनची तपासणी : स्यंपाक घरातील किचनची तपासणी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच बरोबर शाळेतील पीण्याच्या पाण्याचे नमुणे घेण्यात आले आहेत. पाण्याचे टाकीच्या मध्ये असणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. या सर्वांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मोहन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - New Governor Of Maharashtra : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.