ETV Bharat / state

धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा उभारावा - डांगे

author img

By

Published : May 28, 2021, 5:39 PM IST

धनगर समाजाने आता जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापेक्षा आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी केले आहे. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या 397 व्या जयंती निमित्ताने सर्व धनगर समाजाने मतभेद गाडून, आरक्षणाची लढाई सुरू करावी असं देखील त्यांनी म्हटले आहे. ते आष्टा येथे बोलत होते.

धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा उभारावा
धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा उभारावा

सांगली - धनगर समाजाने आता जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापेक्षा आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी केले आहे. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या 397 व्या जयंती निमित्ताने सर्व धनगर समाजाने मतभेद गाडून, आरक्षणाची लढाई सुरू करावी असं देखील त्यांनी म्हटले आहे. ते आष्टा येथे बोलत होते.

धनगर-धनगड फरकामुळे समाज वंचित - डांगे

आण्णासाहेब पुढे बोलताना म्हणाले की, सन १९५६ साली समाजातील मागास जाती जमातींना तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आरक्षण दिले. मात्र यामध्ये धनगर-धनगड असा फरक करण्यात आल्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला ते कुठल्या कुठे जावून पोहोचले. मात्र धनगर समाजाला आरक्षण नाकारण्यात आल्यामुळे समाज विकासापासून वंचित राहिला.

...तरी सरकार आरक्षणाचा निर्णय घेत नाही - डांगे

मा. न्यायमुर्ती चलिया आयोगाने धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच असल्याचे मान्य केले आहे. हा फरक केवळ भाषेमुळे निर्माण झाल्याचे मत नोंदवून तशी शिफारस रजिस्ट्रार ऑफ इंडियाकडे केली. त्यांनी देखील हे मत मान्य केले. मात्र या घटनेला बारा-तेरा वर्ष उलटून देखील अद्यापही राज्य आणि केंद्र शासनाकडून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

धनगर समाजाने आरक्षणासाठी लढा उभारावा - डांगे

याचा समाज धुरीनांनी गांभीर्याने विचार करून आपसातील मतभेद बाजूला ठेवून आरक्षणाच्या लढ्याला सिद्ध झाले पाहिजे. ज्यांना घटनेने आरक्षण दिलेले नाही, ते एकीच्या जोरावर आरक्षण पदरात पाडून घेत आहेत. सर्व राजकीय पक्ष त्यांच्यापुढे लोटांगण घालत आहेत. त्यामुळे आता धनगर समाजाने देखील मतभेद विसरून पुढे आले पाहिजे, आरक्षणासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहनही यावेळी आण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.

हेही वाचा - म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात इंजेक्शनचा पुरवठा करा; केंद्राला उच्च न्यायालयाच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.