सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक सांगलीमध्ये दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाकडून शुक्रवारी (दि. 9 एप्रिल) जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रणय कुमार वर्मा यांनी दिली.
कोरोना नियोजनाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक
सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक सांगलीत दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाकडून पाहणी आणि आढावा घेण्यात येणार आहे. या पथकामध्ये डॉ. प्रणयकुमार वर्मा (सह संचालक केंद्रीय आरोग्य नियंत्रण संस्था) व डॉ. ओम शुभम असाई (एम्स नागपूर ) यांचा समावेश आहे. हे पथक उद्या (शुक्रवारी) मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयाला प्रथम भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रनेणे केलेल्या नियोजनाची पाहणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमधील रुग्णांचीही हे पथक भेटी घेऊन आढावा घेणार आहे.
हेही वाचा - संभाजी भिडे म्हणाले- कोरोना अस्तित्वात नाही, जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील
हेही वाचा - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बिरोबा देवाची यात्रा यंदाही रद्द