ETV Bharat / state

कोरोनाचा संसर्ग ओसरला; जिल्ह्यातील 11 कोरोना रुग्णालये बंद

author img

By

Published : Oct 26, 2020, 5:35 PM IST

जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णालय रिकामे पडत आहेत.

sangli
सांगली जिल्ह्यातील 11 कोरोना रुग्णालय बंद

सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णालय रिकामे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 11 खासगी कोरोना रुग्णालयांचे कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील 11 कोरोना रुग्णालय बंद

जुलैपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले होते -

गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. जुलैपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येने अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परिणामी मृत्यूचा आकडाही वाढत होता. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरू केले होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीनंतर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होऊ लागली आणि हळूहळू कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव हा कमी होऊ लागला आहे.

शहरातील अनेक कोरोना रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नाही -

हेही वाचा - ...म्हणून नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद

त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक कोरोना रुग्णालयांमध्ये शून्य कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. घटत्या कोरोना रुग्णांची संख्या, त्यामुळे कोरोना रुग्णालय रिकामी पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना रुग्णालय बंद करून पूर्ववत रुग्णसेवा सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 11 खासगी कोविड रुग्णालयांना कोरोना सेंटर बंद करून नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ही कोरोना सेंटर आणि रुग्णालये केली बंद -

ज्यामध्ये डॉ. शरद घाडगे यांचे घाडगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, डॉ. महेश दुदनकर यांचे दुदनकर हॉस्पिटल सांगली, डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल सांगली, डॉ.महेश जाधव यांचे अपेक्स हॉस्पिटल मिरज, डॉ. रविंद वाळवेकर यांचे भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली, डॉ.दिपक शिखरे यांचे लाईफकेअर हॉस्पिटल सांगली, डॉ. चोपडे यांचे दक्षिण भारज जैन समाज हॉस्पिटल सांगली, डॉ. सचिन सांगरूळकर यांचे साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर, डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्वर हॉस्पिटल जत, कवठेमहांकाळ येथील कोविड हेल्थ सेंटर व विटा येथील कोविड केअर सेंटर रुग्णालयांचा समावेश आहे.

रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक -

तसेच सदर रुग्णालयांनी विहीत पद्धतीने रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींची पूर्तता करूनच कोविड रुग्णसेवा बंद करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन अथवा हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्याची जिल्ह्यातील कोरोना स्थिती


रविवार जिल्ह्यात 154 कोरोना रुग्णांची भर.

अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 2 हजार 52

जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 44 हजार 193

आजपर्यंत कोरोनामुक्त रुगणांची संख्या 40 हजार 524

आजपर्यंत कोरोना मृत्यू संख्या 1 हजार
617.

दरम्यान, कोरोनाची स्थिती आज जरी जिल्ह्यातले ओसरत असली तरी कोरोनाचे संकट हे अद्याप संपलं नाही.आणि दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे,त्यामुळे सांगलीकर जनतेने राज्य शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.