ETV Bharat / state

'कोरोनाचा नाश कर' वर्तक कुटुंबियांचे बाप्पाला साकडे; आयुर्वेद व होमिओपॅथीचं महत्वही मांडलं देखाव्यातून

author img

By

Published : Aug 23, 2020, 6:33 PM IST

या कोरोनामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे कधी एकदा या कोरोना विषाणूचं संकट दूर होईल याचीच आस सर्वांना लागली आहे. त्यामुळे हे गणराया तूच आता या विषाणूचा नाश कर अशी प्रार्थना गणरायाकडे सर्वच भाविक करत आहेत. कुवारबाव येथील संजय वर्तक यांनीही आपल्या घरच्या देखाव्यातून गणरायाला हेच साकडं घातलं आहे. पूर्णपणे पर्यावरणपूरक असा देखावा त्यांनी बनवला आहे.

'कोरोनाचा नाश कर' वर्तक कुटुंबियांचं बाप्पाला साकडं
'कोरोनाचा नाश कर' वर्तक कुटुंबियांचं बाप्पाला साकडं

रत्नागिरी - कोकणचा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या घरगुती गणेशोत्सवाचं स्वरूप देखील सार्वजनिक गणेशोत्सवासारखं असतं. त्यात पूर्वांपार चालत आलेल्या प्रथा-परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने जपल्या जातात. यावर्षी गणेशोत्सवार कोरोनाचं संकट आहे, मात्र कोकणी माणसाचा उत्साह काही कमी झालेल्या, अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असला, तरी उत्साह मात्र दरवर्षीसारखाच आहे. पण, गणेशोत्सव म्हटले कि देखावे आलेच. या देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होत असतो.

गेली अनेक वर्ष रत्नागिरीतल्या कुवारबाव येथील संजय वर्तकहेही आपल्या घरगुती साकारत असलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देत असतात. यावर्षी कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे 'बाप्पा कोरोनाचा नाश कर' अशी प्रार्थना बाप्पाकडे देखाव्यातून होत असलेली पाहायला मिळत आहे. वर्तक यांनीही यावर्षी पर्यावरणपूरक देखावा साकारत विघ्नहर्ता कोरोनाविषाणूचा नाश करत असल्याचं देखाव्यातून दाखविलं आहे. तसेच भारतीय परंपरेतील आयुर्वेदिक व इतर होमिओपॅथीचा वापर करून आपण आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवून कोरोनाचा सामना कसा करू शकतो हे दाखवत कोरोना संकटाचा नाश करणारा संदेश या निमित्ताने दिला आहे.

'कोरोनाचा नाश कर' वर्तक कुटुंबियांचे बाप्पाला साकडे

गणेशोत्सवातील काही देखावे हे तर लक्षवेधी असतात. तर, काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचाही अनेकजण प्रयत्न करत असतात. तर, काही देखाव्यांमधून आपल्या आजूबाजूला घडत असणारी सत्य स्थिती मांडली जाते. यावर्षी कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या कोरोनामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे कधी एकदा या कोरोना विषाणूचं संकट दूर होईल याचीच आस सर्वांना लागली आहे. त्यामुळे हे गणराया तूच आता या विषाणूचा नाश कर अशी प्रार्थना गणरायाकडे सर्वच भाविक करत आहेत. कुवारबाव येथील संजय वर्तक यांनीही आपल्या घरच्या देखाव्यातून गणरायाला हेच साकडं घातलं आहे. पूर्णपणे पर्यावरणपूरक असा देखावा त्यांनी बनवला आहे.

कोरोना विषाणूचा नाश करत असलेली गणरायाची मूर्ती त्यांनी पूर्णतः पुठ्यापासून बनविली आहे. ही मूर्ती सहा फुटाची असून ती पूर्णपणे पुठ्ठा, कागद, गव्हाच्या पिठाची चिक्की यापासून बनवण्यात आली आहे. तसेच मूर्तीवरील होमिओपॅथिक गोळ्या दर्शवण्यासाठी साबुदाण्याचाही वापर करण्यात आला आहे. तर, आयुर्वेदाचे महत्त्व दाखवण्यासाठी औषधी वनस्पती देखाव्यात ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय पूजेसाठी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली मूर्तीही पूर्णतः शाडू मातीपासूनच बनविण्यात आलेली आहे. एकूणच या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्यात आलाच आहे. शिवाय हा देखावाही लक्षवेधी ठरत आहे. संजय वर्तक यांचं संपूर्ण कुटुंब हा देखावा साकारण्यासाठी त्यांना मदत करत असतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.