ETV Bharat / state

President Ramnath Kovind : राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंडणगड दौऱ्यावर, मोठा फौजफाटा तैनात

author img

By

Published : Feb 12, 2022, 11:53 AM IST

Updated : Feb 12, 2022, 12:13 PM IST

President Ramnath Kovind
President Ramnath Kovind

राष्ट्रपती कोविंद आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार ( President Kovind Visited Amdave ) आहे. यानिमित्ताने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

रत्नागिरी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मंडणगड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे भेट देणार ( President Kovind Visited Amdave ) आहेत. या भेटीत ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराला भेट देतील. त्याठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे.

मोठा पोलीस फौजफाटा

राष्ट्रपती मंडणगडमध्ये येत असल्याने मोठा पोलीस फौजफाटा तालुक्यात तैनात केला आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने मोठी तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी 118 पोलीस अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड असा 1 हजार 118 जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जलद कृतीदल, दंगाकाबू पथके, एसआरपीएफ तुकड्या, बॉम्बशोधक पथके हे देखील दिमतीला आहेत.

आंबडवे गावाला भेट देणारे पहिलेच राष्ट्रपती

आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती मंडणगडात येत असून, आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींनी मंडणगड तालुक्याला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा - Order To Cancel SIT : समीर वानखेडे यांची चौकशी करणारी एसआयटी रद्द करण्याचे मागासवर्ग आयोगाचे आदेश

Last Updated :Feb 12, 2022, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.