ETV Bharat / state

कोरोना लस : 16 लाख डोस साठविता येतील एवढी साठवणूक यंत्रणा जिल्ह्यात तयार - उदय सामंत

author img

By

Published : Dec 10, 2020, 1:09 PM IST

कोरोना लसीच्या वितरणासाठी रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हा सज्ज झाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील आढावा घेतला. 16 लाख डोस साठविता येतील एवढी साठवणूक यंत्रणा जिल्ह्यात तयार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

minister uday samant on corona vaccine storage in ratnagiri
कोरोना लस : 16 लाख डोस साठविता येतील एवढी साठवणूक यंत्रणा जिल्ह्यात तयार - उदय सामंत

रत्नागिरी - कोरोनाची लसीची आता सर्वांना प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता या कोरोना लसीच्या वितरणासाठी रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हा सज्ज झाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील आढावा घेतला. 16 लाख डोस साठविता येतील एवढी साठवणूक यंत्रणा जिल्ह्यात तयार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये लसीकरणासाठी सज्ज असून खाजगी डॉक्टरांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

उदय सामंत माहिती देताना...
जिल्ह्यात दिवसाला १० हजार जणांना लस देण्याची तयारीदिवसाला १० हजार जणांना लस देण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. डिसेंबर अखेरीस कोरोनाची लस येणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यानुसार पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास १५ हजार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना तर सिंधुदूर्गातील १० हजार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. कोरोना तपासणी दोन हजारावर नेली जाणारपण लस येणार असली तरी जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन हजारावर नेली जाणार आहे. ६० टक्के अँटिजेन टेस्ट तर ४० टक्के आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.हेही वाचा - शेतकरी आंदोलनावरुन तावडेंनी नाव न घेता शिवसेनेला फटकारले

हेही वाचा - 'शिवसेना-राष्ट्रवादी सारख्या विरोधकांना "हा" विषय चिघळवायचा आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.