ETV Bharat / state

रत्नागिरीत हिंदू महासभेच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या बांदिवडेकरांना पाठिंबा

author img

By

Published : Apr 8, 2019, 6:20 PM IST

Updated : Apr 8, 2019, 9:21 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. रत्नागिरीतल्या काँग्रेसभवनमध्ये बांदिवडेकर आणि गावडे या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये गावडे यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली.

हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे आणि आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर

रत्नागिरी - एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून घोषीत झाला. त्यांनी लगेच उमेदवारी अर्ज मागे घेत चक्क आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एक नवे समिकरण पाहायला मिळणार आहे.

हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे आणि आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. रत्नागिरीतल्या काँग्रेसभवनमध्ये बांदिवडेकर आणि गावडे या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये गावडे यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली. तसेच आपण दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवीनचंद्र बांदीवडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा संबध सनातनशी जोडला गेला होता. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. असे असताना आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या उमेदवाराने त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदार संघात नवीन समिकरणांची नांदी पाहायला मिळणार आहे. गावडे यांनी पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघात आघाडीची ताकद वाढेल, असा विश्वास बांदीवडेकरांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व जातीधर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष सत्तेत यायला हवा. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीचे राजकारण बंद होऊन सर्वांना समान न्याय मिळेल. एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे अपक्ष लढणे मान्य नसल्याने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे अजिंक्य गावडे यांनी यावेळी सांगितले.

Intro:Body:

हिंदू महासभेच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या बांदिवडेकराना पाठींबा

Inbox

    x

RAKESH MAHADEV GUDEKAR <rakesh.gudekar@etvbharat.com>

    

4:44 PM (2 minutes ago)

    

to me

Feed- FTP



MH RATNAGIRI HINDU-CONGRESS 080419 RAKESK





हिंदू महासभेच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या बांदिवडेकराना पाठींबा



रत्नागिरी, प्रतिनिधी



एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर हिंदू महासभेचे उमेदवार उमेदवार अजिंक्य गावडे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून घोषीत होताच हा उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांनी चक्क आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एक नवे समीकरण पाहायला मिळणार आहे..

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाती़ल काॅग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पहायला मिळाला. हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांनी आपला अर्ज अपक्ष घोषीत होताच काॅग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकरांना पाठिंबा जाहिर केला आहे. रत्नागिरीतल्या काॅग्रेसभवनमध्ये बांदिवडेकर आणि गावडे या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, मनसेचे महेंद्र नागवेकर, कपिल नागवेकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते.  

या पत्रकार परिषदेत गावडे यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली.. तसेच आपण दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..

नवीनचंद्र बांदीवडेकर यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्यांचा संबध सनातनशी जोडला गेल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. असं असताना आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या उमेदवाराने त्यांना पाठिंबा जाहिर केल्याने या मतदार संघात नवीन समिकरणांची नांदी पहायला मिळणार आहे.. गावडे यांनी पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघात आघाडीची ताकद वाढेल असा विश्वास बांदीवडेकरांनी यावेळी व्यक्त केला..

यावेळी अजिंक्य गावडे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की सर्व जातीधर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष सत्तेत यायला हवा, काँग्रेस सत्तेत आल्यास जातीचे राजकारण बंद होऊन सर्वांना समान न्याय मिळेल, माझ्या एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली त्यामुळे अपक्ष लढणे मला मान्य नसल्याने आपला पाठींबा आघाडीच्या उमेदवाराला देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





बाईट-१- अजिंक्य गावडे, हिंदू महासभा



बाईट-२- नवीनचंद्र बांदीवडेकर. काॅग्रेस उमेदवार


Conclusion:
Last Updated : Apr 8, 2019, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.