ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरीत दोघांचा मृत्यू, 1028 घरांचे नुकसान

author img

By

Published : May 18, 2021, 11:43 AM IST

तौक्ते चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1, संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

tauktae cyclone news ratnagiri
तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरीत 450 झाडांची पडझड

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले असून 1028 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिली आहे. चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी1028 घरांचे नुकसान

1028 घरांचे नुकसान -

या वादळामुळे मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर पाच घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

8 व्यक्ती जखमी -

या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1, संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

4563 व्यक्तींचे स्थलांतर -

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत. सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

पती पत्नीचा दूर्देवी मृत्यू -

तौक्ते चक्रीवादळामुळे रस्त्यावर पडलेल्या तुटून ३३ केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून खेड तालुक्यातील बोरज येथील पती पत्नीचा दूर्देवी मृत्यू झाला. ही दूर्घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास बोरज जि.प. शाळेजवळ घडली.

357409 वीज कनेक्शन अद्यापही बंद -

दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी महावितरणचं नुकसान झालं आहे. ठिकठिकाणी विजेचे पोल पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अद्यापही वीज गायब आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू असून 357409 सुरू होणे बाकी आहेत. वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणकडूनही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; केईएम रुग्णालयात ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.