ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ : रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 कोटी 72 लाख नुकसान भरपाई - उदय सामंत

author img

By

Published : May 28, 2021, 8:07 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करुन बाधितांना नाराज करणार नाही, अशी शब्द दिला होता. त्यानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर मदत देण्याचा निर्णय झाला.

ratnagiri taukae cyclon
रत्नागिरी तौक्ते चक्रवादळ

रत्नागिरी - निसर्ग वादळाच्या धर्तीवर तौक्ते चक्रीवादळातील बाधितांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) निकषाप्रमाणे 16 कोटी 48 लाख नुकसान झाले आहे. मात्र, निकष बदलून रत्नागिरी जिल्ह्याला 30 कोटी 72 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्‍चित झाले आहे. यामध्ये कृषीचे 20 टक्के पंचनामे शिल्लक असल्याने त्यामध्ये वाढ होणार आहे. कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी 252 कोटी रुपये भरपाई काल (गुरुवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली. झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निकष बदलून भरपाई देण्याची घोषणा -

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करुन बाधितांना नाराज करणार नाही, अशी शब्द दिला होता. त्यानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर मदत देण्याचा निर्णय झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार 72 कोटींची भरपाई द्यायची होती. मात्र, निकष बदलून कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी 252 कोटीची भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. कृषीचे जे काही पंचनामे झाले आहेत त्याला 100 टक्के भरपाई दिली जाईल. मात्र, अजून 20 टक्के पंचनामे शिल्लक आहेत. त्याची वाढीव भरपाईही देण्यात येणार आहे. जाहीर झालेली भरपाई बाधित व्यक्ती, कुटूंब, मच्छीमार, पशुधन, मृतांसाठी आहे. शासनाच्या एजन्सीचा यामध्ये काही संबंध नाही.

हेही वाचा - पोलीस मारहाण प्रकरण; व्हायरल व्हिडिओमुळे जालना जिल्हा निघाला ढवळून

अशी मिळणार मदत -

वादळामुळे जिल्ह्यात 6 हजार 758 घरांचे 10 कोटी 15 लाख 20 हजाराचे नुकसान झाले आहे. तर पूर्णतः नुकसान झालेली 17 घरे असून त्यांचे 25 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या निकषानुसार अंशतः आणि 15 टक्के नुकसान झालेल्यांना 6 हजारऐवजी 15 हजार दिले जाणार आहेत. 25 टक्क्यांपर्यंतच्या नुकसानीसाठी 15 हजारांऐवजी 25 हजार दिली जाणार आहे. 50 टक्के घराला 50 हजार तर पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना 1 लाख 50 हजार मदत दिली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांसाठी २५२ कोटींचे पॅकेज जाहीर; मंत्री उदय सामंत यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.