ETV Bharat / state

पेणमधील दुकान फोडीतील तीन आरोपींना अटक; 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

author img

By

Published : Jan 22, 2022, 10:40 AM IST

एकाच रात्रीमध्ये आठ दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर पुन्हा एटीएम मशीन फोडून जबर चोरी झाल्याने, पेन पोलिसांवर आरोपी पकडण्याचा तणाव होता. यातून दुःकाणांमध्ये चोरी करणाऱयांपैकी तीन आरोपी सापडल्याने पोलिसांवरील तणाव कमी झाला असून, चोरीच्या भीतीने भयभीत नागरिकांनीही श्वास सोडला आहे.

दुकान फोडीतील तीन आरोपींना अटक
दुकान फोडीतील तीन आरोपींना अटक

रायगड - डिसेंबर महिन्यात पेण शहरात एकाच रात्रीत आठ दुकाने फोडणार्या तीन आरोपींना अटक करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे चोरीच्या भीतीने भयभीत झालेल्या नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला आहे.

25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी -

रायगड जिल्ह्यातील पेण शहरातली पेण, खोपोली मार्ग वरील जलाराम मेडीकल स्टोअर्स, डिमेलोज केक शॉप, साई राज स्वीट मार्ट, रिंगरोड स्टोअर, स्वरा कलेक्शन, चिंतामणी जनरल स्टोअर, चावडीनाका येथील आईस्क्रीम पार्लर व मोबाईल शॉपी या आठ दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 36 हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केला होता. दुकानांचे शटर वाकवून चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. 20 ते 22 वर्षीय चार चोरटे शटर वाकवताना व चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असताना सुध्दा त्यांचा तपास लागत नसल्याने पेण पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या बरोबरच पेण खोपोली मार्गावरील एसबीआय बँकेचे एटीम वर दरोडा टाकून 56 लाख 36 रुपये घेऊन गेल्याने पेण पोलिसांवरील दबाव वाढला होता.

चोरांकडून गुन्हा कबूल -

अखेर अथक प्रयत्न करुन पेण पोलिसांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या आठ दुकानातील चोरी प्रकरणी रवी तानाजी धनगर ( वय 19) रा.आंबिवली , कल्याण,राज विजय राजापूरे ( वय 21 , रा. मध्यप्रदेश, इंदोर ) ,सुनील राम धरणगोयल ( 19 वर्षे , रा. आंबिवली , कल्याण )या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील चौथा संशयित आरोपी बाळकृष्ण पाल हा ठाणे येथे अटक आहे. या आरोपींना पेण न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीं कडून 5 हजार 300 रुपये रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आली आहे. तसेच या आरोपींनी पेण येथून चोरी केलेली मोटार सायकल चोरी केल्याचा गुन्हा व नेरळ शहरात चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती मीनल शिंदे या अधिक तपास करत आहेत.

ओएनच्या नागरिकांनी श्वास सोडला -

एकाच रात्रीमध्ये आठ दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर पुन्हा एटीएम मशीन फोडून जबर चोरी झाल्याने, पेन पोलिसांवर आरोपी पकडण्याचा तणाव होता. यातून दुःकाणांमध्ये चोरी करणाऱयांपैकी तीन आरोपी सापडल्याने पोलिसांवरील तणाव कमी झाला असून, चोरीच्या भीतीने भयभीत नागरिकांनीही श्वास सोडला आहे. तर आरोपी हाती लागल्याने शहरातील सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.