ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ; नुकसानीचे निकष न पाहता भरपाई त्वरित द्यावी, प्रवीण दरेकरांची मागणी

author img

By

Published : Jun 9, 2020, 7:22 PM IST

निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या श्रीवर्धन तालुक्याचा दौरा प्रवीण दरेकर यांनी आज केला.

pravin darekar
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या श्रीवर्धन भागाची पाहणी

रायगड - निसर्ग चक्रीवादळाने पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना 3 लाख 33 हजार तर, 50 टक्के नुकसान झालेल्या घरांना 1 लाख आणि अंशतः नुकसान झालेल्या घरांना 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. तसेच शासनाने नुकसानीचे निकष न बघता ही भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी केली.

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या श्रीवर्धन भागाची प्रवीण दरेकर यांनी केली पाहाणी

केंद्राकडूनही मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, कोकणातील नागरिकांसोबत आम्ही आहोत, असेही ते म्हणाले. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

pravin darekar visit shrivardhan
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या श्रीवर्धन भागाची प्रवीण दरेकर यांनी केली पाहाणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.