ETV Bharat / state

'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'

author img

By

Published : Feb 7, 2020, 9:16 AM IST

मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र, महिलेला प्रथम जबर मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला आणि फासावर लटकवून खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे

bjp leader chitra wagh visit dandur
भाजप नेत्या चित्रा वाघ

नवी मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये आज महिला आणि मुली जीवंत जाळल्या जात आहेत. अजून किती मुली जीवंत जाळण्याच्या बातम्या येण्याची आणि किती बळी जाण्याची वाट राज्यकर्ते पाहणार आहेत, असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. पनवेल तालुक्यातील शारदा माळी या महिलेच्या मृत्यूप्रकरणी चित्रा वाघ यांनी दुंदरे या गावी जाऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'

मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र, महिलेला प्रथम जबर मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला आणि फासावर लटकवून खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेतली. संबधित घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

काय आहे पनवेलची संपूर्ण घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

तपासामध्ये आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शवविच्छेदनात काही गोष्टी प्राप्त झालेल्या असून नातेवाईकांनीही संबंधित स्त्रीच्या मृत्यूच्या कारणावर संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असून पाचही फरार आरोपींना शोधण्यासाठी तीन पथक स्थापन केले आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले आहे.

Intro: या निर्भयांचे जीव वाचवा- चित्रा वाघ
पनवेल मधील मृत महिलेच्या कुटूंबियांची घेतली भेट..



नवी मुंबई:


पनवेल तालुक्यातील शारदा माळी या महिलेच्या मृत्यूप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी दुंदरे या गावी जाऊन मृत महिलेच्या कुटूंबीयांची व नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयातील परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेतली.व संबधित घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली.
मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी, महिलेला प्रथम जबर मारहाण करून, जाळण्याचा प्रयत्न करून, नंतर फासावर लटकवुन खून केल्याचा आरोप, पाच लोकांवर मृत महिलेच्या कुटुंबातील लोकांनी केला आहे. संबधित कुटूंब शारदा माळी यांच्या मृत्यूने हादरून गेले आहे. मृत शारदा माळी यांच्या घरी जाऊन भाजपच्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली व कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. तसेच महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तसेच अजून किती मुली महिलांचे बळी तुम्ही पाहणार आहात असा सवालही त्यांनी राज्यकर्त्याना विचारला आहे. कायद्यांची अंमलबजावणी तीव्र करावी, व कायदे प्रभावीपणे राबवावे असेही त्यांनी म्हंटले आहे. त्याच बरोबर चित्रा वाघ यांनी परिमंडळ 2 चे उपायुक्त अशोक दुधे यांची या घटने संदर्भात भेट घेतली व मृत महिलेच्या कुटुंबातील लोकांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली आहे.
तपासामध्ये आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच शवविच्छेदनात काही गोष्टी प्राप्त झालेल्या असून नातेवाईकांनीही संबंधित स्त्रीच्या मृत्यूच्या कारणावर संशय व्यक्त केला आहे त्या अनुषंगाने तपास सुरू केला असून, पाचही फरार आरोपींना शोधण्यासाठी तीन पथक स्थापन केले आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले आहे.

बाईट्स
अशोक दुधे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2
चित्रा वाघ Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.