ETV Bharat / state

Akhil Bharatiya Marathi Sant Sahitya Sammelan : खालापूरमध्ये संत साहित्य संमेलनाला सुरुवात

author img

By

Published : Jan 22, 2022, 10:02 PM IST

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात १० व्या अखिल भारतील मराठी संत साहित्य संमेलनाला ( Akhil Bharatiya Marathi Sant Sahitya Sammelan ) शनिवारी (दि. २२ जानेवारी) सुरुवात झाली. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करुन या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

रायगड - जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये वारकरी साहित्य परिषद आयोजित करण्यात आली असून १० व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा ( Akhil Bharatiya Marathi Sant Sahitya Sammelan ) शनिवार (दि. २२ जानेवारी) शानदार प्रारंभ झाला. २२ आणि २३ जानेवारी, असे दोन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते उद्घाटन - संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाच्या दिंडी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. ज्ञानोबा तुकारामचा गजर करत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिंडी काढण्यात आली. या संमेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री थोरात यांना व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांना तुळशीच्या माळा घालून सन्मान करण्यात आला.

कोरोनाचे नियम पाळून संमेलनाला सुरुवात - खालापूर तालुक्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. खालापूर येथे पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषद होत आहे. दि. २२ व २३ जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील देवन्हावे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन अगदी कमी उपस्थितीत दोन दिवसांचे केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आज २२ जानेवारी रोजी आमदार महेंद्र थोरवे याच्या हस्ते साहित्य दिंडीचा शुभांरभ झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.