ETV Bharat / state

Pune Crime: प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा नवऱ्याकडून खून; स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

author img

By

Published : Feb 17, 2023, 6:05 PM IST

शहरात कौटुंबिक वादातून खून केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अश्यातच पुण्यातील हडपसर येथे एक धक्कादायक बाब घडली आहे. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा तिच्या नवऱ्याने खून केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर नवऱ्याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Crime
पुणे क्राईम

पुणे: हडपसर येथील खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी स्वाती अक्षय जाधव (वय २२, रा. साई पॅराडाईज हाऊसिंग सोसायटी, खंडोबा माळ, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा नवरा अक्षय आनंदा जाधव (वय २५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वाती यांचे वडील विनायक मारुती थोरात (वय २९, रा. नवनागापूर एमआयडीसी, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.


असे जुळले प्रेम: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक थोरात हे नगर जिल्ह्यातील व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे जेसीबी वाहन आहे. आरोपी अक्षय हा त्यांच्या जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. याच काळात स्वाती आणि अक्षयमध्ये प्रेम जुळले. स्वाती हिने अक्षय सोबत पळून जाऊन लग्न केले होते आणि ते घरच्यांपासून वेगळे राहत होते.


पत्नीचा खून अन् स्वत:चाही आत्महत्येचा प्रयत्न: लग्नानंतर स्वाती जाधव आणि अक्षय जाधव हे पुण्यातील फुरसुंगी या भागात राहत होता. बुधवारी मध्यरात्री कौटुंबिक वादावरून अक्षय याने स्वातीचा खून केला. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षय याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पैशावरून पत्नीचा खून: माहेरून पैसे आणं म्हटल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने थेट पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना 7 ऑक्टोबर, 2022 रोजी सांगली शहरात घडली आहे. या प्रकरणी संशयित पतीस कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती.

वाद पोहोचला विकोपाला: कुपवाडच्या येथील कुमार जाधव याचा विवाह २००३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील मोहन जगदाळे यांची मुलगी सुनंदा यांचेशी विवाह झाला होता. दोघे पती-पत्नी बामनोली येथील दत्तनगर या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कुमार जाधव व व त्यांच्या पत्नी सुनंदा जाधव हे दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते. कुमार जाधव हे कुपवाड एमआयडीसीमध्ये हमाल म्हणून काम करत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास कुमार जाधव आणि त्यांची पत्नी सुनंदा जाधव यांच्यात किरकोळ कारणातून वाद सुरू झाला. ज्यामधून कुमार जाधव याने माहेरून पैसे आणं, असा सुनंदा जाधव यांना सुनावले. ज्याचा राग सुनंदा जाधव यांना आला. यातून त्यांचा वाद पुन्हा वाढला. यामधून कुमार जाधव याने रागाच्या भरात सुनंदावर हल्ला चढवून तिचा खून केला.

हेही वाचा: Sushant Singh Rajput Death Case : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्याची एनसीबीला परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.