ETV Bharat / state

Women Allowed In Mosques: मशिदीत महिलांना नमाज पठणासाठी आहे का परवानगी? जाणून घ्या त्या महिलेसह नागरिकांचे मत

author img

By

Published : Feb 10, 2023, 10:15 AM IST

Updated : Feb 10, 2023, 8:08 PM IST

पुण्याच्या एक मुस्लिम महिला व वकील फरहा अनवर हुसैन शेख यांनी 2020 मध्ये सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यात मशिदीत महिलांना करण्यात आलेली प्रवेश बंदी अवैध घोषित करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने एक शपथपत्र सादर केले. त्यात त्यांनी म्हटले की, महिलांची इच्छा असेल तर त्या मशिदीत जाऊन नमाज पठण करू शकतात. इस्लाममध्ये महिलांना मशिदीत पठण करण्यात कोणतीही मनाई नाही.

masjid muslim girl entry
मशिदीत आत्ता महिलांना ही परवानगी.

मशिदीत आत्ता महिलांना ही परवानगी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय

पुणे: पुण्यातील आझम कॅम्पस येथील मशिदीबाहेर मुस्लिम नागरिकांना या निर्णायाबाबत वविचारले असता ते म्हणाले की, कधीही मुस्लिम महिलांना मशिदीत बंदी नव्हती. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जे म्हटल्याचे स्वागत आहे. पण बोर्डाने जे म्हटले आहे. त्यात महिलांना वेगळी सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. पुणे शहरातील अनेक मशिदीत गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. मशिदीत महिलांना वेगळे ठिकाण तसेच पुरुषांना देखील वेगळे ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. असे यावेळी नागरिकांनी म्हटले आहे.

महिलांनसाठी वेगळी जागा: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे की, महिलांची इच्छा असेल तर त्या मशिदीत जाऊन नमाज पठण करू शकतात. इस्लाममध्ये महिलांना मशिदीत पठण करण्यात कोणतीही मनाई नाही. पण त्यांनी पुरुष नमाजींमध्ये किंवा त्यांच्यासोबत बसू नये. एखाद्या मशिदीत समितीने त्यांच्यासाठी वेगळी जागा निश्चित केली असेल तर महिला तिथे जाऊ शकतात.असे बोर्डाने म्हटले आहे. जी याचिका दाखल केली आहे त्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटल आहे की, मशिदीत महिलांना परवानगी दिली पाहिजे. पण याची व्यवस्था कोण करणार आहे. हे देखील स्पष्ठ केले पाहिजे. तसेच एकाच मशिदीत फक्त महिलांसाठी व्यवस्था नसावी तर सर्वच ठिकाणी ही व्यवस्था करण्यात यावी. असे देखील यावेळी याचिकाकर्ता फरहा अनवर हुसैन शेख यांनी म्हटल आहे. तसेच फरहाने आपल्या याचिकेत दावा केला होता की, इस्लामचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुराणमध्ये महिलांना मशिदीत जाण्यासंबंधीचा कोणताही उल्लेख नाही. या निर्बंधामुळे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करण्यासह त्यांच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचेही उल्लंघन होते.



पुरुषांसाठी नमाज अदाचा नियम: बोर्डाने सादर केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, महिलांनी मशिदीत नमाजासाठी जायचे की नाही, हे त्यांनाच ठरवायचे आहे. मुस्लिम महिलांना 5 वेळ नमाज किंवा शुक्रवारची नमाज अदा करण्याचे कोणतेही बंधन नाही. महिला नमाज घरात किंवा मशिदीत पठण केला तर इस्लामनुसार त्यांना पुण्य मिळणार आहे, अशी माहिती मुस्लीम लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली. पण पुरुषांसाठी असे नाही. त्यांनी मशिदीतच नमाज अदा करण्याचा नियम आहे.

हेही वाचा: Education Department उठा उठा सकाळ झाली मंदिर मशिदी आणि गुरुद्वारांतून आवाज देत पहाटे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उठवणार

Last Updated : Feb 10, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.