ETV Bharat / state

Cylinder Blast At Chakan : गॅस सिलेंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू ; आठ जण जखमी

author img

By

Published : Dec 22, 2022, 10:27 AM IST

पुणे जिल्ह्यात एका दुमजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट (injured in gas Cylinder blast) झाला. या स्फोटात इमारतीची भिंत पडली. एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू (Woman died in gas Cylinder blast) झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले (gas Cylinder blast in building) आहेत.

Cylinder Blast At Chakan
इमारतीत सिलेंडरचा स्फोट

इमारतीत सिलेंडरचा स्फोट

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात असणाऱ्या राणूबाईमळा या भागात एका दुमजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट (gas Cylinder blast in building) झाला. असून या स्फोटात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा स्फोट एवढा जोरात होता की, यात इमारतीची भिंत पडली असून यात आठ जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले (gas Cylinder blast at Chakan in Pune) आहे.


रुग्णालयात दाखल : या स्फोटात चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे ( वय ७५) यांचा मृत्यू (Woman died in gas Cylinder blast) झाला. लक्ष्मीबाई बिरदवडे (वय ७८), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय ४०), अक्षय सुरेश बिरदवडे (वय १८), वैष्णवी ऊर्फ ताई सुरेश बिरदवडे (वय २०) हे किरकोळ जखमी झाली आहे. तर अन्य भाडेकरू देखील यात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (injured in gas Cylinder blast) आहे.

सिलेंडर लिकेज : अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसर पूर्णपणे हादरून गेला (gas Cylinder blast) होता. परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. सिलेंडर लिकेज झाल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्याच्या आवाजने परिसर दणाणला (Cylinder blast at Chakan) होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.