ETV Bharat / state

विनायक काळे 'बॅक टू पॅव्हेलीयन'; मॅटच्या निर्णयानंतर ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळे यांची पुन्हा नियुक्ती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 2:23 PM IST

Vinayak Kale at Sassoon Hospital : ललित पाटील प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. ललित पाटील प्रकरणात डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठाता पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती.

Vinayak Kale at Sassoon Hospital
डॉ विनायक काळे

पुणे Vinayak Kale at Sassoon Hospital : अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा एकदा ससूनच्या अधिष्ठाता पदावर डॉ विनायक काळे यांची वैद्यकीय शिक्षण विभागानं नियुक्ती केली आहे. बुधवारी रात्री उशिरा या निर्णयाची ऑर्डर काढण्यात आली. त्यामुळं काळे 'बॅक टू पॅव्हेलीयन' म्हणजेच ससूनमध्ये येणार असून आज ते ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.


अधिष्ठाता पदी पुन्हा डॉ विनायक काळे : कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील अधिष्ठाता पदावरील नेमणूक रद् करण्यात आली आहे. मॅटनं तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे प्रकरणात ठाकूर यांची अधिष्ठाता पदावरील नेमणूक रद्द केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा ससूनच्या अधिष्ठाता पदी डॉ विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


तत्कालीन अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी : ललित पाटील प्रकरणात काँग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्यानं डॉ संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता डॉ विनायक काळे यांची ससूनच्या अधिष्ठाता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रुग्णालयातूनच सुरु होतं ड्रग्सचं रॅकेट? : ललित पाटील हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला आधीच पोलिसांनी अटक करुन त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. त्याचवेळी वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. तेव्हा रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्यानं हे रॅकेट चालवलं कसं, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

  1. Sassoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईमधून अटक, ससून रुग्णालयातून झाला होता पसार
  2. Sassoon Drugs Racket : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलचा भाऊ नेपाळ बॉर्डरहून ताब्यात
  3. Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ससूनच्या 'डीन'ला दणका; मॅटनं नेमणूक केली रद्द
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.