ETV Bharat / state

Nitin Gadkari : पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार- नितीन गडकरी

author img

By

Published : Aug 12, 2023, 8:57 PM IST

पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic jam in Pune) दूर करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागामार्फत ५० हजार कोटी रुपयांचे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे. तसेच पुणे-बंगळुरू, पुणे- औरंगाबाद हे दोन्ही प्रकल्प लवकरच (Pune Aurangabad project to be completed soon) पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

Chandni chowk Flyovers Inauguration
Chandni chowk Flyovers Inauguration

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic jam in Pune) कमी करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे पूल बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे. पुण्यातील एनडीए चौक (Nitin Gadkari inaugurated the bridge at Chandni Chowk) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा तसेच रस्ते विकास प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते.

गडकरी यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण : खेड तसेच गडकरी यांच्या हस्ते खेड, मंचर रस्ता चौपदरीकरणाचे लोकार्पण देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakantada Patil), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Dr Neelam Gorhe) आदींची उपस्थिती होती.

पुण्याला चोवीस तास पाणी : पुणे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. भविष्यात शहर देशाच्या विकासाचे केंद्र बनेल, इथे अनेकांना रोजगार मिळेल, पुण्याला चोवीस तास पाणी तसेच चांगल्या रस्त्यांची गरज आहे. पुण्याच्या विकासासाठी भारत सरकार मदत करेल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हटले आहे. पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग तसेच नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असे असा दावा देखील नितीन गडकरी यांनी केला आहे.


शहरातील प्रदूषण कमी करा : पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च कमी करण्यासाठी तसेच वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यातील एअर बसेसचाही पर्याय म्हणून अभ्यास करायला हवा. पुण्यात ऑटो रिक्षांना नवीन परवाने देताना इलेक्ट्रिक, इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील प्रदूषण दूर करण्यावर भर : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार केला पाहिजे. पुण्यातील सर्व कचरा विलग करून पुणे रिंगरोडसाठी वापरल्यास कचऱ्याचा प्रश्न सुटेल. पुण्यातील प्रदूषित पाणी शुद्ध करून ते उद्योग, शेती, रेल्वेला पुरवल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

गडकरींकडून अधिकाऱ्यांचे कौतुक : राज्य सरकारच्या नागरी विकास योजनेतून सोलापूर-पुणे, नाशिक शहरातील रस्ते प्रकल्पांसाठी भूसंपादन वेगाने करण्यात आले. चांदणी चौक प्रकल्पासाठीही या निर्णयाचा वापर करण्यात आला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केले असे कौतुक नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे केले आहे.

एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची -फडणवीस : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुणे मेट्रोने 'पुणे वन कार्ड'द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएलला लागू केल्यास त्याची उपयुक्तताही वाढेल. भविष्यात हे कार्ड देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही वापरता येणार आहे. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून, नागरिकांना 500 मीटरच्या आत वाहतुकीचे विविध पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करतील. आता स्मार्ट यंत्रणा तयार होणार असल्याने वेळ, ठिकाण आणि प्रवाशांची संख्याही कळणार असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटेल आहे.

रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी : पुण्यात 10 किमीचा प्रवास 30 ते 40 मिनिटांचा आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्याहून विविध शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते बांधून ही समस्या सोडवता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, राज्य सरकारही यासाठी आपला वाटा उचलेल असा दावा फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात मोठी गुंतवणूक : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. त्यासाठी पुण्यात नवीन विमानतळ होणे गरजेचे आहे. पुरंदरला विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व मान्यता मिळाल्या आहेत. भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले जाईल. पुण्यातील अनेक क्लस्टरसाठी हा कार्गो वरदान ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मेट्रोच्या कामांना गती देणार- अजित पवार : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे हा प्रश्न सुटला. जिल्हा प्रशासनानेही भूसंपादनासाठी चांगले प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस, नागरिकांचेही सहकार्य लाभले. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातही मेट्रोच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वनाज ते चांदणी चौक, वाघोलीपर्यंत कमीत कमी कालावधीत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.

पुण्यातील जनता सहकार्य करेल : पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्री गडकरी तयार असून, त्याचा फायदा पुणे शहराला होणार आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत असल्याने रस्ते, मेट्रो, हवाई वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पुणे इनर रिंगरोडची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी राज्य सरकार पुण्यातील जनता सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही पवार म्हणाले


वाहतूक कोडी दूर होण्यास मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील : एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार असून, शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो प्राधिकरणाने सकाळी सहा वाजता मेट्रोची फेरी सुरू केल्यास त्याचा फायदा सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. राज्यात 18 हजार किमी लांबीचे महामार्ग तयार करण्यात आले आहेत असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

असा आहे रस्ते विकास प्रकल्प : पुणे शहरातील एनडीए चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर एकूण 16.98 किमी लांबीचा पायाभूत सुविधा, रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत 865 कोटी असून या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत, बाह्य सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 8 वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा -

  1. Chandni chowk flyovers Inauguration : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नितीन गडकरींनी सुचवला भन्नाट पर्याय, चांदणी चौक फ्लायओव्हरचे उद्घाटन
  2. Sanjay Raut On BJP : तुरुंगाच्या वाटेवर असणाऱ्यांना भाजपाने मंत्री केले; संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. Ajit Pawar Reply Sanjay Raut : खुर्ची एक असेल तर दोघांनी...; अजित पवारांचा टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.