ETV Bharat / state

Murder Of Friend For Gold : सोन्यासाठी मित्राचे अपहरण करून केली हत्या; मृतदेह नदीत फेकला

author img

By

Published : Oct 31, 2022, 3:57 PM IST

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात (Murder in Pune Bibatewadi Area) एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचे सोन्यासाठी (murder of friend for gold) त्याच अपहरण (friends kidnapping and murder) करून दोरीने गळा आवळून खून (friends murder) केला. यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून (dead body throw in river) दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Pune Crime

Murder Of Friend For Gold
सोन्यासाठी मित्राचे अपहरण करून केली हत्या

पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मित्रासाठी माणूस आपल्या रक्तातील नात्याचा विचार करत नाही. अशा अनेक घटना आणि अनेक प्रकरण आपण पहिल्या आहेत. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात (Murder in Pune Bibatewadi Area) एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राचे सोन्यासाठी (murder of friend for gold) त्याच अपहरण (friends kidnapping and murder) करून दोरीने गळा आवळून खून (friends murder) केला. यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून (dead body throw in river) दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Pune Crime

सोन्यासाठी मित्राचाच खून, आरोपी अटकेत

असा रचला खूनाचा कट - निलेश दत्तात्रय वरघडे (वय ४३ वर्षे, रा. चाळ नं.बी/८२ खोली नं.२४, सुप्पर इंदिरा नगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून दिपक जयकुमार नरळे (वय-२९ वर्षे) आणि रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९ वर्षे) या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. मृत निलेश वरघडे याचा मृतदेह अजून ही सापडलेला नाही. 16 ऑक्टोबर रोजी निलेश वरघडे हा घरी परत न आल्याने रूपाली रुपेश वरघडे यांनी खबर दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन मिसग रजि. नं. ६०/२०२२ दाखल करण्यात आली. याचा तपास करीत असताना मिसींग वरघडे व्यक्ती ही दीपक जयकुमार नरळे याचेबरोबर गेला होता व दिपक नरळे याने स्वतःचा मोबाईल फोन बंद करून आपले अस्तित्व लपविले. हे अपहरण त्याने दागिण्याचे मोहापोटी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केलेबाबत रूपाली वरघडे यांनी तक्रार दिली.

कॉफीच्या गोळ्या खाऊ घालून गळा दोरीने आवळला - त्यानुसार त्याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी दिपक जयकुमार नरळे याचे मोबाईल तांत्रिक आधारे त्यास शिताफीने पकडून तपास करण्यात आला. त्याने त्याचा साथीदार नामे आरोपी रणजीत ज्ञानदेव जगदाळे याचेबरोबर कट करून निलेश वरघडे यास कॉफीमधून झोपेच्या गोळ्या देऊन नंतर त्याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदीत फेकला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.


मुद्देमाल जप्त - गुन्हयात वापरलेली एक कार, दोन दुचाकी वाहने तसेच सोन्याचे दागिने, दोन मोबाईल असा एकूण १९,१६,४००/ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.