ETV Bharat / state

तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द करण्यामागे 'फॅसिस्ट' शक्ती - कुमार सप्तर्षी

author img

By

Published : Feb 7, 2020, 11:57 AM IST

पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात होणाऱ्या तुषार गांधी यांच्या भाषणाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी याचा तीव्र निषेध केला.

कुमार सप्तर्षी
कुमार सप्तर्षी

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 'रिव्हिजिटींग गांधी' या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात होणाऱ्या तुषार गांधी यांच्या भाषणाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी याचा तीव्र निषेध केला.

कुमार सप्तर्षी

हेही वाचा- 'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'

आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवार) पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते आज होणार होते. तर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांना बीजभाषणसाठी निमंत्रित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, कॉलेज ज्या संस्थेचे आहे. त्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने विद्यापीठात तुषार गांधी आणि अन्वर राजन यांची उपस्थिती नको असे पत्र विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार तुषार गांधी आणि अन्वर राजन यांना कोणतेही कारण न देता तुमचे भाषण रद्द करण्यात आल्याचे ऐनवेळी कळवण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याने महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी याचा तीव्र निषेध केला. हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे अचानक निमंत्रण रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Intro:मॉर्डन कॉलेज मधील तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द करण्यामागे फॅसिस्ट शक्ती, कुमार सप्तर्षीBody:mh_pun_01_kumar_saptarshi_on_morden_college_avb_7201348

anchor
पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'रिव्हिजिटींग गांधी' या राष्ट्रीय कार्यशाळेतील तुषार गांधी यांच्या भाषणाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केल्याने या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येतोय.. शुक्रवार 7 फेब्रुवारी आणि शनिवार 8 तारखेला पुण्यातील मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उदघाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते आज होणार होते
तर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांना बीजभाषणसाठी निमंत्रित करण्यात आले होते...विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते मात्र कॉलेज ज्या संस्थेचे आहे त्या
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने
विद्यापीठात तुषार गांधी आणि अन्वर राजन यांची उपस्थिती नको असे पत्र विद्यापीठाला डिलेंहॉटे आणि त्यानुसार
तुषार गांधी आणि अन्वर राजन यांना कोणतेही कारण न देता तुमचे भाषण रद्द करण्यात आल्याचे ऐनवेळी ऐनवेळी कळवण्यात आले , ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याने महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी याचा तीव्र निषेध केलाय हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे अचानक निमंत्रण रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे...
byte कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, महात्मा गांधी स्मारक निधीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.