ETV Bharat / state

Train Accident Conspiracy Foiled: मोठी दुर्घटना टळली, रेल्वे रुळावर आढळले मोठं मोठे दगड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 8:01 PM IST

Updated : Oct 6, 2023, 11:00 PM IST

Train Accident Conspiracy Foiled
रेल्वे उलटवण्याचा होता कट

Train Accident Conspiracy Foiled : पुणे विभागातील चिंचवड ते आकुर्डी (Chinchwad to Akurdi railway line) दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर मोठं-मोठे दगड रचून (Stones on railway tracks) रेल्वे गाडीला अपघात करण्याचा आज (शुक्रवारी) डाव रचला होता. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनाने (Vigilance of railway employees) सुदैवाने तो डाव उधळला गेला. (Pune Railway Department)

रेल्वे रुळावर अशाप्रकारे रचण्यात आले दगड

पिंपरी चिंचवड (पुणे) Train Accident Conspiracy Foiled : काही समाजकंटकांनी रेल्वे रुळांवर लावलेले मोठे दगड वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. चिंचवड-आकुर्डी विभागात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास दगड सापडले. अशाच एका अपघाताचा कट उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेससोबत घडविण्यासाठी काही समाजकंटकांनी आखला होता. मात्र, लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळे सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र, लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.


रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांची सतर्कता : रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठे दगड अप लाईन ट्रॅकवर टाकण्यात आले होते. रेल्वेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी या विभागात रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी पाहिले की UP लाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवले आहेत. कर्मचार्‍यांनी या गैरप्रकाराचा वेळीच शोध घेतल्याने मोठा अनैसर्गिक अपघात घडण्याची शक्यता टळली. आरपीएफ आणि जीआरपीकडून पुढील तपास सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच घातपाताचा कट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्तौडगड दौऱ्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. सोमवारी सकाळी काही समाजकंटकांनी उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवरुन घसरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेमुळं हा अपघात टळलाय. उदयपूरहून जयपूरला येताना ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात दगड आणि रॉड ठेवण्यात आले होते. त्याचा एक व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओमध्ये कामगार ट्रॅकवरुन दगड हटवताना दिसत आहेत.

लोको पायलटनं दाखवली सतर्कता : मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरहून निघाल्यानंतर वंदे भारत सकाळी ९.५५ वाजता चित्तौडगडला पोहोचणार होती. दरम्यान, सोनियाना ते गांगरार रेल्वे स्थानकादरम्यानच्या मार्गावर ही घटना घडली. ट्रॅकवर काहीतरी असल्याचं जाणवल्यानं लोको पायलटनं ट्रेन थांबवली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी ट्रॅकवर मोठे दगड आणि रॉड दिसून आले. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशिकिरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटच्या सतर्कतेमुळं हा अपघात टळला आहे. रेल्वे विभागाकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा:

  1. Udaipur Jaipur Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकवर दगड अन् रॉड, पाहा व्हिडिओ
  2. Railway News: रेल्वे रूळ तुटला; तरुणाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला
  3. Patliputra Express Accident : पाटलीपूत्र एक्सप्रेसची कपलींग तुटली; अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे
Last Updated :Oct 6, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.