ETV Bharat / state

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना 'किंग किंवा किंगमेकर' होणार - संजय राऊत

author img

By

Published : Jun 5, 2021, 3:31 PM IST

पुण्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास शिवसेना 80 जागा लढवणार आहे. तसेच यंदा पुण्यात शिवसेना 'किंग किंवा किंगमेकर'ची भूमिका बजावणार असल्याचे अस मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

sanjay raut pune press conference
पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना किंग किंवा किंगमेकर होणार - संजय राऊत

पुणे - राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने एकत्र येत निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. पुण्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास शिवसेना 80 जागा लढवणार आहे. तसेच यंदा पुण्यात शिवसेना किंग किंवा किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे अस मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात शिवसेना भवन येथे आयोजित शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया

'शरद पवार यांच्यावर टीका करण्याची फॅशन आहे'

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची आजकल फॅशन झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आजकाल शरद पवार यांच्यावर कोणीही टीका करत आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही म्हणून विरोधक आज शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले.

'आम्ही छातीवर वार करतो; पाठीत खंजीर खुपसत नाही'

जे शिवसेनेला ओळखतात त्यांना माहिती आहे की शिवसेना कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना ही समोरून वार करते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. आम्ही छातीवर वार करतो आणि छातीवर वार झेलतो. म्हणून आम्ही परिणामाची पर्वा करत नाही. देवेंद्र फडणवीस जे पाठीत खंजीर खुपण्याचे सांगत आहे, असे काहीही झालेले नाही. तीन पक्ष एकत्र आले आहे, ते चोरून एकत्र आलेले नाही. या तिन्ही पक्षांनी एकत्र येत समान कार्यक्रम हाती घेतला आणि त्याद्वारेच हे सरकार चालत आहे, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - अनैतिक संबंधातून नवऱ्याचा किचनमध्येच पुरला मृतदेह, २८ वर्षीय तरुणीसह प्रियकराला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.