ETV Bharat / state

Sharad Pawar On Oxford University : 'ऑक्सफर्ड विद्यापीठ हेच उच्च ज्ञानापीठ', शरद पवार याचं बारामतीत वक्तव्य

author img

By

Published : Mar 23, 2022, 6:44 PM IST

Sharad Pawar On Oxford University
Sharad Pawar On Oxford University

ऑक्सफर्ड विद्यापीठाला ( Oxford University ) स्वतंत्रपणे विद्या ज्ञानाविषयी वेगळी ओळख आहे. विद्यापीठांपैकी सर्वात प्राचीन असलेले हे जगद्विख्यात उच्च ज्ञानापीठ आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे या विद्यापीठाचे सर्टिफिकेट आहे, याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मोठा आधार मिळणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Statement On Oxford University ) यांनी व्यक्त केला.

बारामती - ऑक्सफर्ड विद्यापीठाला ( Oxford University ) स्वतंत्रपणे विद्या ज्ञानाविषयी वेगळी ओळख आहे. विद्यापीठांपैकी सर्वात प्राचीन असलेले हे जगद्विख्यात उच्च ज्ञानापीठ आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे या विद्यापीठाचे सर्टिफिकेट आहे, याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मोठा आधार मिळणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Statement On Oxford University ) यांनी व्यक्त केला. बारामती आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी लंडन विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सुनेत्रा पवार उपस्थित होते.

'विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मोठा फायदा' : पवार पुढे म्हणाले, ऑक्सफर्ड विद्यापीठ जगद्विख्यात ज्ञानापीठ असून ज्या विद्यार्थ्यांकडे या विद्यापीठाचे सर्टिफिकेट आहे, याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मोठा आधार मिळणार आहे. विद्यापीठाला स्वतंत्रपणे विद्या ज्ञानाविषयी वेगळी ओळख आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक-संशोधन विभाग अतिशय सक्षम आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अथवा संशोधन पातळी आल्याला येथे शिक्षण उपलब्ध होणार आहे. कृषीसह अन्य अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा देणे शक्य होणार असल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा - Mask Free Mumbai Soon : मुंबईकरांसाठी खुशखबर.. मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.