ETV Bharat / city

Mask Free Mumbai Soon : मुंबईकरांसाठी खुशखबर.. मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..

author img

By

Published : Mar 23, 2022, 5:49 PM IST

मुंबईमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेल्या क्लीन अप मार्शलचे अधिकार काढून घेण्यात येणार ( Clean Up Marshals Rights Revoked Soon ) आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने लवकरच मुंबईतील मास्क सक्ती मागे ( Mask Free Mumbai Soon ) घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने ( BMC Administration ) दिली आहे.

मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..
मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेले दोन वर्षे मुंबईकरांना तोंडावर मास्क घालावे लागत होते. मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. ही कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या क्लीन अप मार्शलचे अधिकार काढून घेतले जाणार ( Clean Up Marshals Rights Revoked Soon ) आहेत. तसेच लवकरच मास्क सक्तीचा नियम रद्द करण्यात येणार ( Mask Free Mumbai Soon ) आहे. यामुळे मुंबईकरांना लवकरच मास्क पासून मुक्ती मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती ( BMC Administration ) दिली.

मुंबईत कोरोना आटोक्यात जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार मुंबईमध्ये मार्च २०२० पासून सुरु झाला. काही दिवसातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने देशभरात मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली. एप्रिल २०२० पासून मुंबईमध्ये जे नागरिक मास्क घालत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली. १७ एप्रिल २०२० ते ९ मार्च २०२२ या ७०८ दिवसात ४५ लाख ९३ हजार ८०५ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ९१ कोटी ३५ लाख ९५ हजार ०७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दंड वसूल करताना क्लिनअप मार्शल आणि मुंबईकर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..
क्लीन अप मार्शल

लवकरच मास्क मुक्ती मुंबईत विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सात संस्थांच्या माध्यमातून ७५० क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले. मुंबई पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यानंतर ९० टक्के मुंबईकरांनी मुंबई महापालिकेच्या नियमांचे पालन केले. त्यामुळेच कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले. सध्या कोरोना विषाणूचे सर्वात कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील मास्कची सक्ती बंद करण्यात येणार आहे. क्लीनअप मार्शलला दिलेले अधिकार काढून घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मास्क सक्तीचा नियम रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असून पुढील काही दिवसांत यावर निर्णय होईल, असे काकाणी यांनी सांगितले.

स्वतःच्या काळजीसाठी मास्क गरजेचे - कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा पहिला डोस ११८ टक्के तर दुसरा डोस ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोना व ओमायक्राॅन विषाणुचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. तरीही स्वतःची व आपल्या घरच्यांची काळजी घेण्यासाठी तोंडावर मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व दोघांमध्ये सहा मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे असून मुंबईकरांनी या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.