ETV Bharat / state

शरद पवारांनी सपत्नीक पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; राज्य सरकारकडं करणार 'ही' मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 12:17 PM IST

Sharad Pawar On Satyashodhak Movie : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' हा सिनेमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सपत्नीक पुण्यातील चित्रपट गृहात जाऊन पाहिला.

sharad pawar says satyashodhak movie should be shown in all schools of the state
शरद पवारांनी सपत्नीक पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; राज्य सरकारकडे करणार 'ही' मागणी

शरद पवारांनी सपत्नीक पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; राज्य सरकारकडे करणार 'ही' मागणी

पुणे Sharad Pawar On Satyashodhak Movie : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा विशेष प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईडमध्ये आयोजित करण्यात आला होता. चित्रपट बघितल्यानंतर शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

'सत्यशोधक' चित्रपटात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही : "हा एक उत्तम चित्रपट असून यामध्ये फुलेंच्या आयुष्यातील प्रसंग वास्तव रुपात मांडण्यात आले आहेत. तसंच चित्रपटात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. मात्र, सध्याचं चित्र पाहता आजच्या काळात आपण 50 ते 60 वर्ष मागे जातोय की काय, अशी सामजिक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी मांडलेला 'सत्यशोधक' विचार समाजापर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचं आहे." तसंच हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दाखवण्यात यावा अशी विनंती राज्य सरकारला करणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

'सत्यशोधक'चा अर्थ कुठल्या जाती धर्माचा विरोध नसून वास्तविकता आहे, आणि हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

नितीन गडकरींच्या गैरहजेरीवरही दिली प्रतिक्रिया : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (12 जानेवारी) झालं. मात्र, या कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी हजर नव्हते. तसंच जाहिरातींमध्येसुद्धा त्यांचं नाव नव्हतं. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. तसंच शुक्रवारी भाषणात, यापूर्वी हजारो कोटींचे घोटाळे होत होते. मात्र, आता त्याच किंमतीची काम होत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, नितीन गडकरी आणि माझा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील आजचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीच ठरला होता. नितीन गडकरी हे माझ्यासोबत व्हिएसआय येथील कार्यक्रमाला आले होते. त्यामुळं ते अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत. तसंच मी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं नाही, ते ऐकल्यावर बोलेन, अशी भूमिका यावेळी शरद पवारांनी मांडली.

हेही वाचा -

  1. "पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान", सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका
  2. टेन्शन वाढलं! पुतण्याकडं राष्ट्रवादी जाण्यापासून वाचविण्याकरिता शरद पवारांसमोर कोणती आहेत आव्हानं?
  3. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी शरद पवारांचा राहुल नार्वेकरांना सल्ला; म्हणाले 'प्रतिमा जपली पाहिजे'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.