ETV Bharat / state

बालसुधार गृहातील अल्पवयीन आरोपीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; पुण्यातील घटनेनं खळबळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 12:25 PM IST

Updated : Nov 21, 2023, 1:18 PM IST

Sexual abuse case : पुण्यातील बालसुधार गृहामध्ये एका अल्पवयीन आरोपीवर तिघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sexual abuse on minor boy in a juvenile home by three accused
बालसुधार गृहातील अल्पवयीन आरोपीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार

पुणे Sexual abuse case : पुण्यातील येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधार केंद्रामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका 17 वर्षीय आरोपीवर कुख्यात आरोपी असलेल्या तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तिन्ही आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामुळं बालसुधार गृहात : यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सांगलीतील मिरजगाव येथील एका सतरा वर्षीय आरोपीला पुण्यातील येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधार केंद्रात सध्या ठेवण्यात आलं होतं. मात्र, याच बालसुधार गृहात राहणाऱ्या तीन आरोपींकडून या अल्पवयीन आरोपीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. लैंगिक अत्याचार करणारे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यात सध्या बालसुधार गृहात आहेत.

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : सदर घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, भीतीपोटी पीडित आरोपीनं काही सांगितलं नाही. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची माहिती कारागृह प्रशासनाला कळताच सोमवारी (20 नोव्हेंबर) पीडित आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच बालसुधार गृहातील तिन्ही आरोपींवर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया तपास पोलीस अधिकारी सुरेखा गाताडे यांनी दिली आहे. तसंच या प्रकरणी अधिक तपासणी सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.


या आरोपींविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकामध्ये अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालसुधारगृहातच अशा घटना घडत असल्यानं आता या सुधारगृहातील प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पुण्यातील बालसुधारगृहात नेमकं चाललय काय, हा प्रश्न सुद्धा पुढं येत आहे.

हेही वाचा -

  1. पुण्यात किरकोळ वादातून मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर
  2. Baramati Crime News : महिलेवर बलात्कार करत उकळले पैसे; पीडितेच्या पतीलाही ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा
  3. Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
Last Updated : Nov 21, 2023, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.