ETV Bharat / state

विद्यार्थी पदवी घेतात मात्र, पुढे काय करायचे हे त्यांना समजत नाही - भगतसिंह कोश्यारी

author img

By

Published : Jan 8, 2020, 8:42 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि फरिदाबाद येथील 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कांग यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदवी ते पीएचडीपर्यंतची एकूण 1 लाख 9930 पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडी पदव्यांचा समावेश होता.

sppu
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे - विद्यार्थी पदवी घेतात, पीएचडी होतात मात्र, पुढे काय करायचे हे त्यांना समजत नाही. मात्र दिशा ठरवली तर, ते काहीही करू शकतात, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११६वा पदवीप्रदान समारंभ आज (8 जानेवारी) पार पडला. याप्रसंगी कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि फरिदाबाद येथील 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कांग यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, "मी आज राज्यपाल आहे. मात्र, हायस्कूलमध्ये शिकत असताना माझ्या पायात चप्पलही नव्हती. त्यावेळी मी एक धोरण ठरवले; कुणाचे वाईट करायचे नाही आणि विद्वानांबरोबर राहायचे. त्यामुळे माझे शिक्षणही पूर्ण झाले आणि चांगली संधीदेखील मिळाली"

हेही वाचा - 'जेएनयू' हल्ल्याचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून निषेध

देशाच्या भल्यासाठी बुद्धी आणि क्षमतेचा वापर करण्याचे आवाहनदेखील राज्यापालांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले आहे. यावेळी पदवी ते पीएचडीपर्यंतची एकूण 1 लाख 9930 पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडी पदव्यांचा समावेश होता.

Intro:राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्नBody:mh_pun_01_unviercity_padvidan_avb_7201348

anchor
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११६ वा पदवीप्रदान समारंभ बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि डॉ गगनदीप कंक याच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी पदवी ते पीएचडीपर्यंतची अशी एकूण एक लाख नऊ हजार ९३० पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.यामध्ये ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडी पदव्यांचा समावेश होता.
यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विद्यार्थी डिग्री घेतला पीएचडी होतात मात्र पुढे काय करायचं हेच त्याना समजत नाही,
पण दिशा नीट असली तर तुम्ही काहीही करू शकतात, मी आज राज्यपाल आहे मात्र हायस्कूल मध्ये पायात चप्पल नव्हती त्यावेळी माझे काय परिस्थिती असेल असे सांगत, मी एक धोरण ठेवलं बुरा नही करना बुरा नही सोचना चांगल्या लोकांच्या विद्वानांच्या बरोबर राहायचं.त्यामुळे शिक्षणही पूर्ण झाले आणि चांगली संधी मिळाली असे राज्यपाल म्हणाले. आज सर्व जण नोकरीच्या माग धावतात. मात्र नोकऱ्या नाही.मनुष्यबळ आहे मात्र त्याचा वापर होत नाही, बुद्धी क्षमतेचा वापर केला तर देशासाठी सर्वाधिक योगदान देऊ शकतो, आत्मविश्वास हवाय.आयुष्यात संकट तर येतच असतात आमच्याही जीवनात आलेली आहेत असे त्यांनी सांगितले...

Byte - भगतसिंग कोश्यारी,राज्यपालConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.