ETV Bharat / state

Rickshaw Pullers On Hunger Strike : बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे पुण्यात आजपासून बेमुदत उपोषण ; रिक्षा संघटना आक्रमक

author img

By

Published : Nov 28, 2022, 9:33 AM IST

बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झाले असून आज पासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार (Rickshaw pullers hunger strike against bike taxi) आहेत. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार (hunger strike against bike taxi in Pune) आहेत.

Rickshaw Pullers On Hunger Strike
बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे आजपासून बेमुदत उपोषण

पुणे : बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झाले असून आजपासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार (Rickshaw pullers hunger strike against bike taxi) आहेत. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार (hunger strike against bike taxi in Pune) आहेत. शहरातील विविध रिक्षा संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलिस बाईक टॅक्सीविरोधात जुजबी कारवाई करीत आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या अॅपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा, या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला या संघटनेकडून उपोषण करण्यात येणार आहे.


रिक्षा बंदची हाक : रिक्षा चालकांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १७०० बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. नेहमीच्या तुलनेत सुमारे १०० बस जास्तीच्या सोडल्या जाणार आहे. काही रिक्षा संघटनांनी 28 नोव्हेंबर, महात्मा फुले स्मृतिदिनापासून विविध मागण्यांसाठी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली आहे. बंदमधील मागण्यांना रिक्षा पंचायतीचा पाठिंबा आहे. मात्र संयोजक संघटनांना पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे या बेमुदत बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंचायतीचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आज येथे जाहीर केली (Rickshaw Pullers On Hunger Strike) आहे.

Rickshaw Pullers On Hunger Strike
रिक्षाचालकांचे आजपासून बेमुदत उपोषण



शाळेबाहेर पोस्टरबाजी : आदरणीय पालकांनी आज दि. 28 नोव्हेंबर 22 पासून पुणे RTO इथे सकाळी 10 वाजल्यापासून आमचे बेमुदत आंदोलन चालू होईल. आंदोलनात मोठ्याप्रमाणात रिक्षाचालक सहभागी होणार असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व परंतु आमच्याही घरी मुले आहेत. अनेकांच्या शाळा सुटल्या शिक्षण थांबले. हाल अपेष्टा होत आहे. त्यामुळे भ्रष्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आशा करतो की आपण समजावून घ्याल. असे फलक विविध शाळेच्या बाहेर रिक्षा संघटनेने लावले (Rickshaw pullers on indefinite hunger strike) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.