ETV Bharat / state

'महाविकास आघाडी सरकारने राजू शेट्टींना त्यांची जागा दाखवली'

author img

By

Published : Jan 25, 2020, 11:19 PM IST

शेतकऱ्यांसाठी कधीकाळी एकजुटीने लढणारे नेते आता एकमेकांवर शेतकऱ्यांमध्ये बसून टीका करत आहेत.

Raghunath Dada Patil
रघुनाथदादा पाटील

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तयार होत होते, तेव्हा माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होत असलेल्या पक्षांच्या बाजूने बोलत होते. मात्र, ज्यावेळी सरकार स्थापन झाले तेव्हा सरकारच्या शपथविधीत त्यांना मंत्रिपद देण्याचे बाजूलाच राहिले. पण, साधे निमंत्रणसुद्धा शेट्टींना दिले नाही. महाविकास आघाडीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असा टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला.

रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते

शेतकऱ्यांसाठी कधीकाळी एकजुटीने लढणारे नेते आता एकमेकांवर शेतकऱ्यांमध्ये बसून टीका करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राजू शेट्टींनी सरकारचे कौतूक केले. त्यानंतर त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे त्यांनी सरकारला नावे ठेवायला चालू केले, अशी शेट्टींची दुटप्पी भुमिका काय कामाची, असे मत पाटलांनी व्यक्त केले.

सत्तेची लालच दाखवून आमच्यात फूट पाडण्याचे काम मागील काळापासून सुरु आहे. सत्तेच्या मागे पळणाऱ्या नेत्यांना त्यांची किंमत महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिली आहे, असा टोला पाटलांनी लगावला.

Intro:Anc_राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तयार होत होते तेव्हा माजी खासदार राजु शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होत असलेल्या पक्षांच्या बाजुने बोलत होते त्यावेळी सरकार स्थापन झाले आणि त्यांना सरकारच्या शपथविधीत मंत्रीपद देण्याचे बाजुलाच राहिलं पण साधं निमंत्रण सुद्धा राजु शेट्टींना दिलं तर नाही पण त्यांना त्यांची जागा दाखवुन दिल्याचा चिमटा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी चाकण येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलले


शेतक-यांसाठी कधीकाळी एकजुटीने लढणारे नेते आता एकमेकांवर शेतक-यांमध्ये बसुन टिकाटिपणी करायला लागलेत ठाकरेंचे सरकार स्थापन होत असताना राजु शेट्टींनी त्यांच्या सरकारचे कौतुक केलं आणि त्यांना सहभागी करुन घेतले नाही तर लगेच ठाकरेच्या सरकारला नावे ठेवायला सुरु झाले अशी राजु शेट्टींचा दुटप्पी भुमिका काय कामाची असे परखड मत रघुनाथ पाटलांनी व्यक्त केले

सत्तेची लालच दाखवुन आमच्यात फुट पाडण्याचे काम मागील काळापासून सुरु आहे आणि यामध्ये यावेळी सत्तेच्या मागे पळणाऱ्या नेत्यांना त्यांची किंमत महाविकास आघाडी सरकारने दाखवुन दिली आहे असे बोलत रघुनाथ पाटलांनी राजु शेट्टी,सदाभाऊ खोत,पाशा पटेल यांचा चांगलाच समाचार घेतला.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.