ETV Bharat / state

Vijaystambha felicitation ceremony : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त, सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून खबरदारी

author img

By

Published : Dec 29, 2022, 5:06 PM IST

भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक ( Victory Pillar Bhima Koregaon ) येतात. यंदा त्यापार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला ( Police Force Deployed in Bhima Koregaon ) आहे. 6000 हून अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात येत ( Vijaystambha felicitation ceremony )आहेत.

Victory Pillar Salutations
विजयस्तंभ अभिवादन

पुणे : दरवर्षी एक तारखेला जानेवारीच्या पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक ( Victory Pillar Bhima Koregaon ) येतात. आणि त्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याने पुणे पोलिसांनी आता कडेकोट बंदोबस्त ठेवलेला ( Police Force Deployed in Bhima Koregaon ) आहे. पुणे पोलिसातील 6000 अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी राज्य राखीव पोलीस दल, शीघ्रकृती दलाच्या, पथकाच्या तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबरोबर स्पॉटर किट वाहन, व्हिडिओ कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरा नजर ठेवले जाणार ( Vijaystambha felicitation ceremony ) आहे.

सुरक्षेवर भर देण्यात आला : भीमा कोरेगाव या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी झालेला दंगल, आणि दरवर्षी येणाऱ्या लाखो नागरिकांचे अभिवादनासाठी होत असलेली गर्दी पाहता, 3 वर्षापासून विजय स्तंभाच्या सुरक्षितेवर प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्या दृष्टीने यावर्षी पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दलाकडून विजय स्तंभाच्या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुययांची यांच्या सुरक्षितेवर भर देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक त्यांच्याकडून मागील काही दिवसापासून सातत्याने बैठका घेऊन, बंदोबस्त व सुरक्षितेबाबतच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली आहे,दरम्यान विजयस्तंभ परिसरात गोपनीय यंत्रणा ही सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारचा आक्षेप होइल असा मजकूर समाज माध्यमावर प्रसारित करू नये. असे आवाहन पोलिसांनी केले. विजयस्तंभ परिसरात कोणीही हुलाडबजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत.

240 सीसीटीव्ही कॅमेरे : पोलिसांकडून या ठिकाणी 240 सीसीटीव्ही कॅमेरे, स्पॉटर किट वाहन 05, व्हिडिओ कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, अतिरिक्त पोलीस आयुक्त 4 पोलीस उपयुक्त 15 सहाय्यक पोलीस उपयुक्त 21 पोलीस निरीक्षक 90 सहाय्यक पोलीस निरीक्षक 250 पोलीस कर्मचारी 4000 गृह रक्षक दल 1000 बीडीएस पथके 11, क्यूआरटी पथके06, आरसीपी स्ट्रयकिंग 05, एस आर पी एफ, 08 तसेच कुणाला काही माहिती मिळाल्यास माहिती देण्यासाठी 020261262 96 हा संपर्क क्रमांक दिला असून व्हाट्सअप क्रमांक 897953100 हा दिला आहे तर पोलीस नियंत्रण कक्ष 112 हा नंबर दिलेला ( precautions to avoid any mischief during ceremony ) आहे.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण? : पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा ( Bhima Koregaon case ) अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होतं. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.