ETV Bharat / state

तळेगाव; फी माफीसाठी पालकांचे बेमुदत उपोषण

author img

By

Published : Dec 29, 2020, 1:07 PM IST

मुलांच्या शाळा अद्याप ही शासनाने सुरू केल्या नाहीत. मात्र, शाळा ऑनलाइन क्लासेसची अवाजवी फी घेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वर्षभर शाळा बंद असतानाही शालेय फीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कोरोनामुळे रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे अनेक पालक सध्या फी भरण्याच्या अवस्थेत नाहीत. मात्र, शाळा प्रशासन हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसून जमेल तशी फी भरण्याची मुभा त्यांनी पालकांना दिली आहे.

तळेगाव; फी माफीसाठी पालकांचे बेमुदत उपोषण
तळेगाव; फी माफीसाठी पालकांचे बेमुदत उपोषण

पुणे- (पिंपरी-चिंचवड) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील अनेक शाळा बंद आहेत. तरीही खासगी शाळांनी पालकांकडून अवाजवी फी वसुलीसाठी तगादा लावला आहे. कोरोना महामारीमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे शालेय फी माफ करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. फी माफीच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात पालकांनी खासगी शाळेच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत फी माफी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळत याबाबत पालकांना जमेल तशी फी भरण्याची मुभा दिली आहे.

तळेगाव; फी माफीसाठी पालकांचे बेमुदत उपोषण
मार्च महिन्यापासून शाळा बंद....मार्च महिन्यात कोरोना महामारीचा शिरकाव झाला. लॉकडाऊनही त्याच महिन्यात लागू करण्यात आले. परिणामी शाळांही बंद ठेवण्यात आल्या. गेली ९ महिने शाळा बंद आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा विषाणू अधिक प्रभावशाली असल्याने इतर देशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तरीही शाळा अवाजवी फी घेत असल्याचा पालकांचा आरोपया सर्व पार्श्वभूमीवर मुलांच्या शाळा अद्याप ही शासनाने सुरू केल्या नाहीत. मात्र, शाळा ऑनलाइन क्लासेसची अवाजवी फी घेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वर्षभर शाळा बंद असतानाही शालेय फीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कोरोनामुळे रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे अनेक पालक सध्या फी भरण्याच्या अवस्थेत नाहीत. मात्र, शाळा प्रशासन हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसून जमेल तशी फी भरण्याची मुभा त्यांनी पालकांना दिली आहे. फी माफीसाठी पालकांचे बेमुदत उपोषण...तर, फी माफीच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात पालकांनी खासगी शाळेच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत फी माफी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.