ETV Bharat / state

आता 150 लाभार्थ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ

author img

By

Published : Apr 17, 2021, 6:43 PM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या काळात कष्टकरी, मजूर, बेघर गरीब नागरिकांचे हाल होऊ नये, म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना शिव भोजन थाळी देण्यात येत होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करून प्रत्येक केंद्रावर 150 जणांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

150 लाभार्थ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ
150 लाभार्थ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ

पुणे - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या काळात कष्टकरी, मजूर, बेघर गरीब नागरिकांचे हाल होऊ नये, म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना शिव भोजन थाळी देण्यात येत होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करून प्रत्येक केंद्रावर 150 जणांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र दिवसाला एका केंद्रावर केवळ 150 जणांनाच थाळी मिळत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते, त्यामुळे शिवभोजन थाळीच्या संख्येत आणखी वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

150 लाभार्थ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ

जिल्ह्यात एकूण 96 ठिकाणी शिवभोजन केंद्र

पुणे जिल्ह्यात एकूण 96 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू असून, आजपासून दिवसाला 150 जणांना एका केंद्रावर शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. दोन पोळी, भात वरण आणि एक भाजी असे पदार्थ या शिवभोजन थाळीमध्ये असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सलच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहे.

शिवभोजन थाळीसाठी नागरिकांची गर्दी

वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक संचारबंदीमुळे अनेक कष्टकरी, मजूर, बेघर लोक शिवभोजन थाळीसाठी गर्दी करत आहेत. प्रत्येक केंद्रावर अवघ्या अर्ध्या ते एका तासात शिवभोजन थाळी संपत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने शिवभोजनात आणखी वाढ करावी अशी मागणी केंद्रचालकांकडून देखील होत आहे.

हेही वाचा - बारामतीत बनावट रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.