ETV Bharat / state

Notice to Ruby Hospital : पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉस्पिटला धर्मदाय आयुक्तांची नोटीस, नेमक प्रकरण काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 10:15 PM IST

Notice to Ruby Hospital : पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉस्पिटला गरीबांचे पैसे लुटण्याच्या संशयातून धर्मदाय आयुक्तांनी नोटीस बजावलीयं. रुबी हॉस्पिटलने राज्य शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये दिलेल्या निर्णयाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत, धर्मदाय आयुक्तांनी नोटीस बजावलीयं. धर्मदाय आयुक्तांच्या नोटीसीला आम्ही योग्य उत्तर देऊ असं रूबी हॉस्पिटलच्या कायदेवीषयक सल्लागार ॲड. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितलयं.

पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉस्पिटला धर्मदाय आयुक्तांची नोटीस
Notice to Ruby Hospital

पुणे Notice to Ruby Hospital : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलला धर्मदाय आयुक्तांनी (Charity commissioner Pune) नोटीस बजावलीयं. रुबी हॉस्पिटलकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचा भंग झाला असून गरीबांचे पैसे लुटण्याचा संशय आल्यानेच ही नोटीस देण्यात आल्याचं बोललं जातयं. रुबी हॉस्पिटलला धर्मदाय आयुक्तांकडून मिळालेली नोटीस सध्या चांगलीच चर्चचा विषय बनलीयं.


धर्मदाय आयुक्तांची फसवणूक : पुण्यातील रुबी हॉस्पिटल (Ruby Hospital Pune) ग्रँड मेडिकल फाउंडेशन ट्रस्टकडून चालवण्यात येतं. हे धर्मदाय हॉस्पिटल असल्यानं राज्य शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार धर्मदाय आयुक्तांच्या हॉस्पिटलमध्ये दहा टक्के खाटा या गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. गरीब रुग्णांना उपचार देता येऊ नये, यासाठी मूळ उत्पन्नाच्या कमी उत्पन्न दाखवून रुबी हॉस्पिटलने धर्मदाय आयुक्तांचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामुळे एक प्रकारे गरीब रुग्णांना याचा फटका बसला असून रुग्णालयाच्या ऑडिटमध्ये गंभीर बाबी दिसून येत असल्याचं धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या नोटीसमध्ये (Ruby Hospital Notice) म्हटलयं. रुबी हॉस्पिटलकडून उत्तराची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया धर्मदाय आयुक्त सुधीरकुमार बुके यांनी दिलीयं. दुसरीकडे, आमच्या ऑडिटमध्ये बँकेचा काहीही गैरव्यवहार झाला नसून, पीएफ योजनेवर आमचं रुग्णालय काम करतं अशी प्रतिक्रिया रुबी हॉस्पिटलच्या कायदे विषयक सल्लागार ॲड. मंजुषा कुलकर्णी यांनी दिलीयं. धर्मदाय आयुक्तांच्या नोटीसीला आम्ही योग्य उत्तर देऊ असं देखील त्यांनी सांगितयं.

धर्मदाय आयुक्तांनी घेतली दखल : या सर्वांमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून रुबी हॉस्पिटलने सर्वसामान्य रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सुरू केलायं. बाहेरून पंचतारांकित वाटणारे हे रुग्णालय सर्वसामान्यांना सेवा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असताना रुग्णालयाच्या सेवा देण्यासाठी त्यांचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करून भ्रष्टाचार करत असेल तर ही गंभीर बाब आहे. यामुळे धर्मदाय आयुक्तांनी याची दखल घेतल्याच बोललं जातयं.

हेही वाचा :

  1. Bombay High Court on Contempt: न्यायालयाची अवमानना झाली तर... त्या पाच अधिकाऱ्यांना न्यायालयाकडून तंबी
  2. Construction In Army Ammunition Area : पुणे महापालिकेनं 'त्या' बांधकामाला दिलीय परवानगी, उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
  3. Pune Crime : नाचताना पबमध्ये भिरकावला तिरंगा... गायिकेसह आयोजकाविरोधात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.