ETV Bharat / state

Rupali Chakankar : सुषमा अंधारे यांच्याबाबतचा कोणताही अहवाल महिला आयोगाकडे आला नाही - रुपाली चाकणकर

author img

By

Published : May 31, 2023, 7:03 PM IST

Updated : Jun 1, 2023, 4:41 PM IST

सुषमा अंधारे यांच्याबाबतचा कोणताही अहवाल महिला आयोगाकडे आला नाही अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. 'सुषमा अंधारे पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे महिला आयोगाने पोलिसांना अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र, महिला आयोगाला कोणताही अहवाल पोलिसांनी दिलेला नाही.' असे चाकणकर म्हणाल्या.

Sushma Andhare
Sushma Andhare

रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

पुणे : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात महिला आयोगानेसुद्धा याचा योग्य तपास करून अहवाल देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पोलिसांचा अहवाल आला असून संभाजीनगर पोलिसांकडून संजय शिरसाट यांना क्लिन चिट दिल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'सुषमा अंधारे पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे महिला आयोगाने पोलिसांना अहवाल देण्याचे सांगितले होते. मात्र, महिला आयोगाला कोणताही अहवाल पोलिसांनी दिलेला नाही.' - रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा

अहवाल मिळालाच नाही : पुढील तपासासंदर्भात सुषमा अंधारे सरकारी वकिलाची मदत घेऊ शकतात असा अहवाल देण्यात आला असावा. मात्र, पोलिसांनी माझ्याकडे कोणताही अहवाल दिलेला नाही. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाल्यास मी स्वत: अहवाल मागवणार असल्याचे रुपाली पाटील चाकणकर यांनी म्हटले आहे.

कुठल्याही सरकारमध्ये पोलीस यंत्रणेवर सरकारी यंत्रणेचा दरारा असतो. कदाचित असा दबाव पोलीस यंत्रणेवर असेल त्यामुळेसुद्धा अहवाल न येणे साहजिक आहे. परंतु महिला आयोग म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुसरा अहवाल मागवण्याचा प्रयत्न करू. तसेच पुढील तपास करण्यास सांगू असे रूपाली पाटील चाकणकर यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांच्याबाबतचा कोणताही अहवाल महिला आयोगाकडे आला नाही अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. 'सुषमा अंधारे पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या मात्र, त्यांची तक्रार पोलिसांना दाखल करुण घेतली नव्हती. त्यामुळे महिला आयोगाने पोलिसांना अहवाल देण्याचे सांगितले होते. मात्र, महिला आयोगाला कोणताही अहवाल पोलिसांनी दिलेला नाही.' असे चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा -

Mahaprabandhak Yatra: महाप्रबोधन यात्रेत धडाडणार संजय राऊत यांची तोफ; सुषमा अंधारे काय बोलणार याकडे लागले लक्ष

Last Updated : Jun 1, 2023, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.