ETV Bharat / state

Pune crime : खून का बदला खून; खूनाचा बदला घेण्यासाठी मंडईत गोळीबार करून कोयत्याने वार

author img

By

Published : Dec 29, 2022, 10:53 AM IST

Updated : Dec 29, 2022, 11:05 AM IST

पुण्यातील गजबजलेल्या रामेश्वर चौकात शेखर शिंदे वय 32, राहणार केशवनगर मुंढवा रोड मांजरी याच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले होते. (Pune crime )हा हल्ला अक्षय वल्लाळ याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला होता. (Shoot and stab him to avenge murder) मंडईतील गजबजलेल्या रामेश्वर चौकात ही घटना घडली होती. (avenge murder in pune ) याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी शिंदे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोन, अशा सात जणांच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (murder reprisal murder)

murder reprisal murde
खून का बदला खून

पुणे : नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून 26 जुलै रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास वल्लाळ याचा महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोघांनी धारधार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंट काँक्रिटचा दगड घालून खून केला होता. ( murder reprisal murder ) याबाबत अतुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर समर्थ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. ( akashay vallal murder revenge ) वल्लाळ खून प्रकरणातील आरोपी किशोर शिंदे हा शेखर शिंदे याचा मोठा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे. (Pune crime ) अक्षय वल्लाळ यांच्या खुनानंतर त्या वस्तीतील लोकांकडून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी समर्थ पोलीस स्टेशन येथे मोर्चा देखील काढण्यात आला होता. (Shoot and stab him to avenge murder)

अशी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर शिंदे हा दुचाकीवरून फोनवर बोलत मंडईतील गजबजलेल्या रामेश्वर चौकातून निघाला होता. त्यावेळी आरोपी रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोघे तेथे आले. त्यातील एकाने शिंदे याच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. मात्र ती चुकली. तर इतर आरोपीनी कोयत्याने शिंदे याच्या डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान शिंदे हा जीव वाचवून तेथून पळून जात असताना, आरोपींनी त्याचा पाठलाग करून पकडले. तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्लाळ याचा खून केला. त्याचा बदला म्हणून आज तुझा खून करणार आहे.तुला जीवंत सोडणार नाही असे बोलून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. शिंदे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिंदे याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी फरार असून, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. ( Avenge murder in pune )

अक्षय वल्लाळ खून प्रकरण :अक्षय हा रात्री उशिरापर्यंत मित्र मंडळींमध्ये बसायचा. मित्रांच्या अडी-अडचणीला धावून जाणारा सच्चा मित्र म्हणून त्याची ओळख. अक्षय वल्ल्याळ, किशोर शिंदे, महेश बोरा हे तिघेही नाना पेठ नवा वाडा येथ राहणारे जिगरी मित्र. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याच मित्रांमध्ये पाणी फेकण्यावरून एक छोटीशी भांडण झाली आणि ती भांडण अक्षयने सोडवली. त्याचा समाजात वाढत असलेला वर्चस्व हेच महेश आणि किशोर ला खटत होता. समाजात अक्षयची प्रतिमा ही चांगली होती. कोणाच्याही हाकेला धावणारा म्हणून अक्षयांची ओळख. नाना पेठ येथील नवा वाडा येथे राहणारे यांचे अनेक मित्र हे अक्षयलाच प्राधान्य द्यायचे. आणि हेच वर्चस्व किशोरला वारंवार खटकत होते. यातूनच वाढत असलेला मनातला राग हा टोकाला गेला. अक्षय ची आई विजया वल्लाळ ही विडी कामगार असून ती आजही विडी चां काम घरीच करते. तेव्हा त्याच्या मनात शंका आली की 6 महिन्यांपूर्वी ज्या मित्राबरोबर भांडण झाली त्यांना त्याने घरी पाठवल.आणि तो किशोर शिंदे ,महेश बोरा यांच्या सोबत थांबला. अन् पाहता पाहता या दोघांनी अक्षयवर सपासप 35 वार केले. हे दोघेही फक्त वार करून थांबले नाहीत. किशोरने मोठा दगड उचलून अक्षयच्या डोक्यात घातला. यातच अक्षयचा मृत्यू झाला. मात्र दोन मित्रांची मनातली कुजबुज ही त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतली.

Last Updated : Dec 29, 2022, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.