ETV Bharat / state

ST Organization: एसटी बँकेच्या सर्वसाधारण सभेचा खर्च 6 लाख; पडळकरांची सहकार आयुक्तांकडे चौकशीची मागणी

author img

By

Published : Nov 12, 2022, 10:43 AM IST

ST Organization Demand: सर्वसाधारण सभा घेण्याकरिता तब्बल 6 लाख रुपये खर्च झाल्याचं बँकेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आला. .यामुळे या बँकेत मोठा घोटाळा होत आहे. असा आरोप बँकेच्या संचालक मंडळावर आणि अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

ST Organization Demand
ST Organization Demand

पुणे: सरकार दरबारी चालणाऱ्या संस्था कधी काय करतील, याचा हिशोब नसतो. एसटी कामगारांच्या हितासाठी एसटी कामगार संघटनेची एसटी बँक आहे. त्या बँकेमध्ये कोरोना काळात ज्यावेळेस कुणालाच बाहेर पडता येत नव्हतं. त्या काळात सर्वसाधारण सभा घेण्यासाठी तब्बल 6 लाख रुपये खर्च झाल्याचं बँकेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आलेला आहे. त्यामुळे या बँकेत मोठा घोटाळा होत आहे. असा आरोप बँकेच्या संचालक मंडळावर आणि अधिकाऱ्यावर होत आहे. या सर्वांची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी सघांची एसटी संघटना आहे. त्याने सहकार आयुक्तांकडे केलेली आहे.

एका सभेचा खर्च 6 लाखाच्या आसपास: हे प्रकरण नेमकं काय आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळातर्फ एसटी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट बँक चालवली जाते. या बँकेच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 56 शाखा आहेत. जवळपास 80 हजार कर्मचारी या बँकेचे सभासद आहेत. आणि या बँकेची वार्षिक उलाढाल ही जवळपास 12000 कोटीच्या जवळपास आहे. त्यामुळे या एसटी कामगारांचे कष्टाच्या पैशाची कोणी उधळण करते का ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये जवळपास सर्वच व्यवस्था बंद असताना एसटी कामगार संघाची जी बँक आहे. त्या बँकेने सर्वसाधारण सभा बोलवले, सर्वसाधारण सभेचा एका सभेचा खर्च 6 लाखाच्या आसपास दाखवण्यात आलेला आहे.

सर्वांची चौकशी करण्यात यावी: कोरोना काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे कुणीच घराबाहेर पडत नव्हतं. कुठलीच येण्या- जाण्याची व्यवस्था नव्हती. मग या सर्वसाधारण सभेला ऑनलाईन सहभाग घेण्यासाठी एवढा खर्च आलाच कसा असा प्रश्न ? आता कर्मचारी विचारत आहेत. आणि त्यामुळेच या सर्वांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्याने सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे केलेली आहे.

ठेवीवर सुद्धा मोठा घोटाळा: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर एसटी पुन्हा 3 महिन्यांनी सुरू झाली. त्याच जोमाने एसटी सुरू होऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटले, असे म्हटले जात असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यापूर्वी त्यांच्या बँकेतील ठेवीवर सुद्धा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. ही बँक जी आहे ते अधिकारी आपल्या हितासाठी चालवतात कामगारांच्या हितासाठी नाही, असेही या कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.

ऑडिटमध्ये दाखवण्यात आलेला: या बँकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अध्यक्ष म्हणून असतात. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या गलतन कारभार कामगारांच्या जीवावर उठतो का ? काय असं चित्र सध्या दिसत आहे. कारण किरकोळ खर्च व्यावसायिक फीस जवळपास 46 लाख रुपये 2020- 21 आणि 21- 22 ला जवळपास 96 लाख रुपये इतकी दाखवण्यात आलेली आहे. एवढा मोठा खर्च या ऑडिटमध्ये दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्हाला शंका येत असल्याचं कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. आणि हे ऑडिट जे केलेला आहे. ते एसटी बँकेने अधिकृतरित्या त्यांच्या ऑडिट करून करून घेतलेला आहे. आणि त्यात हा सगळा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या एसटी बँकेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची शंका येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.