ETV Bharat / state

Fire At Mask Manufacturing Factory : एम फिल्टर कंपनीला भीषण आग; तीन कामगार जखमी तर कोट्यवधींचे नुकसान

author img

By

Published : Dec 17, 2022, 4:10 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

पुण्यातील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला अचानक आग ( Fire Broke Out In Mask Manufacturing Factory ) लागली. पाण्याचा पुरवठा कमी पडल्याचे चित्र परिसरात पहायला मिळाले. त्यामुळे खासगी वॉटर टॅँकची मागणी करण्यात आली. आगीचे कारण स्पष्ट नाही. आगीत तीन कामगार जखमी झालेत.

एम फिल्टर कंपनीला आग

पुणे : वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग ( Fire Broke Out In Mask Manufacturing Factory ) लागली. आगीच्या ज्वाळांचे व काळ्या धुराचे लोटच लोट आकाशात जात ( Fire Broke Out In Aim Filter Factory ) होते. आगीच्या काळ्या धुराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीमध्ये तीन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग का लागली याचे कारण अद्याप ही स्पष्ठ झालेले नाही.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न : कंपनीत उत्पादित माल हा ज्वलनशील असल्यामुळे आगीचे प्रमाण इतके भयाण होते की संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या उत्पादनासाठी आवश्यक असणारा गॅसच्या टाक्या आगीच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तसेच स्फोट झाल्याने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.


पाण्याचा पुरवठा कमी पडला : पुणे महानगर प्राधिकरण वाघोली येथील अग्निशामक दल, आळंदी नगरपरिषद व रांजणगाव औद्योगिक त्याचप्रमाणे आजूबाजूला असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सुरक्षा साधनांची मदत केली. परंतू आगीची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग विझवण्यासाठी अत्यावश्यक असणारा पाण्याचा पुरवठा कमी पडल्याने ( Water Shortage To Extinguish Fire ) खाजगी पाणी पुरवठादरांकडे पाण्याच्या टँकरची मागणी करत पुरवठा करन्यासाठी पाचारण करण्यात आले परंतु घटना स्थळी रस्त्याचे सुरू असणारे काम व बघ्यांची गर्दी मोठ्याप्रमानात आसल्याने मदत कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता.


अग्नीशमन जवानांची तारेवरची कसरत : कारखान्याला लागलेल्या आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने कारखान्याच्या आतमध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना ( Fire Brigade Efforts To Control Fire ) जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे. कारखाना परिसरात कुठल्याही आगविरोधी आवश्यक साहित्य व उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती, पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला व कंपनीला आग लागल्याने तातडीने वीज पुरवठा बंद केल्याने स्थानिक शेतकर्यांचा विहिरीतून पाणी घेन्यासाठी अडथळा निर्माण होत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.