ETV Bharat / state

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून फसवणूक; मनोहरमामाला पाच दिवसाची पोलीस कोठडी

author img

By

Published : Sep 11, 2021, 7:25 PM IST

Updated : Sep 11, 2021, 7:37 PM IST

संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

Manohar mama bhosale
मनोहरमामा भोसले

बारामती(पुणे) - संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवस (१६ सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.

मनोहरमामा भोसलेला न्यायालयात आणताना

हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा - नितेश राणे

  • पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश -

दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्म हाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला अटक केली होती. त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी (११ सप्टेंबर) न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

  • काय आहे प्रकरण?

संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. किरण सोनवणे यांनी तर भोसलेकडून अॅड. विजय ठोंबरे यांनी काम पाहिले. भोसले याचे अन्य दोन साथीदार अद्याप फरार आहेथ. मनोहर भोसले याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येत तक्रार दाखल कऱण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे

Last Updated : Sep 11, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.